Advertisement

बीएनएचएसच्या ३३ एकर जागेवर सरकारचा डोळा!

गोरेगाव फिल्मसिटीतील अंदाजे ३३ एकर जागा (जंगल) राज्य सरकारनं बीएनएचएसला १९८३ मध्ये रिसर्चसाठी दिली होती. या जागेचं दरवर्षी राज्य सरकारकडून नूतीनकरण केलं जातं. गेली कित्येक वर्षे या ३३ एकरच्या जंगलात बीएनएचएसचं काम सुरू आहे. असं असताना यंदा राज्य सरकारनं या जागेचं नूतीनकरण केलेलं नाही. ही जागा बीएचएनएसकडून काढून घेत फिल्म टूरिझमच्या नावे बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव राज्य सरकारचा असल्याचा आरोप 'वनशक्ती'चे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे.

बीएनएचएसच्या ३३ एकर जागेवर सरकारचा डोळा!
SHARES

कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो-३ मार्गासाठी आरेतील ३३ एकर जागा घेतल्यानंतर आता राज्य सरकारचा डोळा आहे तो आरेलगतच्या गोरेगाव फिल्मसिटीतील 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' (बीएनएचएस)च्या ताब्यातील ३३ एकर जागेवर. फिल्मसिटीच्या फिल्म टूरिझम प्रकल्पासाठी ही जागा देण्याच्या सरकारचा विचार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील एकमेव शिल्लक राहिलेलं जंगल नष्ट करण्याच्या सरकारच्या या निर्णयाला विरोध होत असून यावरून आता नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

जागेचं नूतनीकरण थांबवलं

गोरेगाव फिल्मसिटीतील अंदाजे ३३ एकर जागा (जंगल) राज्य सरकारनं बीएनएचएसला १९८३ मध्ये रिसर्चसाठी दिली होती. या जागेचं दरवर्षी राज्य सरकारकडून नूतीनकरण केलं जातं. गेली कित्येक वर्षे या ३३ एकरच्या जंगलात बीएनएचएसचं काम सुरू आहे. असं असताना यंदा राज्य सरकारनं या जागेचं नूतीनकरण केलेलं नाही. ही जागा बीएचएनएसकडून काढून घेत फिल्म टूरिझमच्या नावे बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव राज्य सरकारचा असल्याचा आरोप 'वनशक्ती'चे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे.

फिल्म टूरिझम उभारण्याचा डाव

१ हजार ८४२ कोटी रुपये खर्च करून फिल्मसिटीमध्ये फिल्म टूरिझम उभारण्याचा फिल्मसिटीचा प्रस्ताव आहे. यात ३१ अद्ययावत स्टुडियो, आठ राज्यातील संस्कृतीवर आधारित आठ गावांची प्रतिकृती आणि ४५ आऊटडोअर लोकेशन अशाप्रकारचा हा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पासाठी फिल्मसिटीला अंदाजे २४५ एकर जागेची गरज आहे. खासगी-सार्वजनिक तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पासाठी बीएनएचएसमधील जमीन राज्य सरकारकडे मागण्यात आल्याची माहिती आहे.

आधी आरेची जागा मेट्रोच्या नावावर लाटत सरकारनं जंगल नष्ट करण्यास सुरूवात केली आहे. आता फिल्मसिटीमधील जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा अाणि जंगल नष्ट करण्याचा डाव फिल्म टूरिझम प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य सरकारनं आखला आहे. हा डाव पर्यावरणप्रेमी कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाहीत.
- स्टॅलिन दयानंद, 'वनशक्ति'चे प्रकल्प संचालक

मुख्यमंत्र्यांचं नूतनीकरणाचं अाश्वासन

याविषयी बीएनएचएसचे संचालक दिपक आपटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप बीएनएचएसच्या ताब्यातील जागेचं नुतनीकरण झालं नसल्याचं सांगितलं आहे. तर काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीएनएचएसला भेट दिली होती, त्यावेळी त्यांनी लवकरात लवकर नूतनीकरण करून देऊ, असं आश्वासन दिलं होतं. फिल्म सिटीच्या प्रस्तावाबाबत काहीही बोलण्यास अापटे यांनी नकार दिला आहे.

हेही वाचा -

MMRDA मैदान ६ वर्षांसाठी शांत? मोठ्या सभा, इव्हेन्ट आता होणार नाहीत!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा