Advertisement

कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयांचे दर निश्चित, 'असे' आहेत दर

शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत. यात निश्चित दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत.

कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयांचे दर निश्चित, 'असे' आहेत दर
SHARES

कोरोना (coronavirus) रुग्णांच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये (private hospital) प्रचंड खर्च येत आहे. अनेकांना हा खर्च परवडत नाही. त्यामुळे अनेक रुग्ण रुग्णालयात भरती होत नसल्याचं आढळून आलं आहे. परिणामी अनेकांचा जीव गेला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने खासगी रुग्णालयांच्या उपचारांचे दर (Treatment rates) निश्चित केले आहेत. 

सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी याबाबतच्या अधिसूचनेला मंजुरी दिली आहे. यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत. यात निश्चित दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. या अधिसूचनेची काटेकोर आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना निर्देश देण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

असे असतील दर 

- अ वर्ग शहरांसाठी ४,००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ३,००० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २,४०० रुपये. 

- यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण यांचा समावेश. कोविड चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागेल. केवळ मोठ्या चाचण्या व तपासणी, तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.

व्हेंटिलेटर

अ वर्ग शहरांसाठी ९००० रु., ब वर्ग शहरांसाठी ६७०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ५४०० रुपये.

आयसीयू व विलगीकरण 

- अ वर्ग शहरांसाठी ७५०० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ५५०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ४५०० रुपये 

- अ वर्ग शहरांत मुंबई तसेच महानगर क्षेत्र ( भिवंडी , वसई-विरार वगळून), पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर ( नागपूर मनपा, दिगडोह, वाडी), 

- ब वर्ग शहरांत नाशिक, औरंगाबाद, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली तसेच सर्व जिल्हा मुख्यालये 

- क गटात अ आणि ब गटाव्यतिरिक्त इतर शहरे.



हेही वाचा -

आता रस्त्यावर थुंकल्यास १२०० रुपये दंड; महापालिकेचा निर्णय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई विमानतळाला फटका

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा