Advertisement

उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढवण्यास हिरवा कंदील

मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स सोबतच्या बैठकीत दिले आहेत.

उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढवण्यास हिरवा कंदील
SHARES

२२ ऑक्टोबरपासून दुकानांच्या वेळा वाढवून देण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स सोबतच्या बैठकीत दिले आहेत. तसंच राज्यातील चित्रपट गृहं, नाट्यगृहांसोबत अम्यूझमेंट पार्कही सुरू होणार आहेत.

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्यानं राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसंच अम्युझमेंट पार्कमधील वॉटर पार्कशिवाय अन्य उपक्रमांना परवानगी देण्याचं ठरलं. पार्क्स मधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्यात येईल.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होतांना दिसते. २२ ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहं आणि दुकानं यांच्या देखील वेळा वाढवून देण्याची सातत्यानं मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

दुसरी लाट संथ झाली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे आणि हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच लोकांनी बेसावध राहू नये म्ह्णून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी.

या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, संचालक डॉ दिलीप म्हैसेकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, पालिका उपायुक्त सुरेश काकाणी, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ खुसराव्ह, डॉ अजित देसाई, डॉ सुहास प्रभू आदी उपस्थित होते.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा