Advertisement

राज्यात मराठी भाषा पंधरवड्याचं उद्‌घाटन

मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालविण्याची गरज असून ‘मराठी बोला, मराठीतून व्यवहार करा व मराठीचा आग्रह धरा’ असं आवाहन सुभाष देसाई यांनी केलं.

राज्यात मराठी भाषा पंधरवड्याचं उद्‌घाटन
SHARES

राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (subhash desai) यांच्या हस्ते मराठी भाषा पंधरवड्याचं गुरूवार १४ जानेवारी रोजी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात उद्‌घाटन करण्यात आलं. यावेळी मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालविण्याची गरज असून ‘मराठी बोला, मराठीतून व्यवहार करा व मराठीचा आग्रह धरा’ असं आवाहन सुभाष देसाई यांनी केलं.

मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती  मंडळ, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, उच्च व तंत्र शिक्षण (ग्रंथालय) विभाग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात १४ जानेवारी ते २८ जानेवारी या दरम्यान मराठी भाषा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने राज्यभरात राज्य शासनाच्यावतीने ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

हेही वाचा- ‘ती’ मलाही जाळ्यात अडकवत होती, भाजप नेत्याच्या एन्ट्रीने मुंडे प्रकरणाला वेगळं वळण

मराठी भाषा विभागाने मराठी भाषेच्या सर्व उपक्रमांना पुढे नेण्याचं काम केलं आहे. ते कौतुकास्पद असून त्याचं फलित आज दिसू लागलं आहे. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मराठी भाषेला पुढे नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी काही ना काही लिखाण करीत आहेत. ही मंत्रालयाला लाभलेली प्रदीर्घ परंपरा आहे. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी ही परंपरा पुढेही चालू ठेवावी, असं आवाहन सुभाष देसाई यांनी केलं.

मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जी पुस्तके लिहिली आहेत त्याचे प्रदर्शन मराठी भाषा पंधरवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ठेवण्यात येईल. या प्रदर्शनाच्या माध्यमातून इतरांनाही प्रेरणा मिळेल. मराठी भाषा विभागातर्फे या कामासाठी पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यांना आजपासून मराठी भाषेचे अग्रदुत म्हणून गणलं जाईल, असंही सुभाष देसाई यांनी सांगितलं.

प्रत्येक विभागात कारभार मराठीत झाला पाहिजे बँक, पोस्ट, रेल्वे या ठिकाणी मराठी भाषेमधून व्यवहार व्हावा यासाठी आग्रह धरला पाहिजे. राज्यातील (maharashtra government) केंद्र सरकारच्या कार्यालयातील कारभार मराठी भाषेतून व्हावा असं केंद्र सरकारचं धोरण आहे. या धोरणाचा त्या ठिकाणी प्राधान्याने वापर व्हावा. केंद्रीय कार्यालयात दर्शनी भागावर मराठीमध्ये फलक लावण्यात यावे, असंही सुभाष देसाई यांनी सांगितलं. 

(maharashtra minister subhash desai inaugurates marathi language conservation fortnightly programme)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा