Advertisement

'टेस्ला' येऊ शकते महाराष्ट्रात, रोहीत पवार यांनी दिली माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहीत पवार यांनी राज्य सरकार टेस्लासह इतर ई-वाहन कंपन्या महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती दिली आहे.

'टेस्ला' येऊ शकते महाराष्ट्रात, रोहीत पवार यांनी दिली माहिती
SHARES

महाराष्ट्राला डावलून टेस्ला या वाहननिर्मिती कंपनीने बंगळुरूची निवड केल्याने राज्य सरकारवर अप्रत्यक्षरित्या टीका केली जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहीत पवार यांनी राज्य सरकार टेस्लासह इतर ई-वाहन कंपन्या महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती दिली आहे.

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी अशी टेस्लाची ओळख आहे. या कंपनीचे शेअर्स काही दिवसांपूर्वीच वधारल्याने कंपनीचे प्रमुख एलन मस्क जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जाऊन विराजमान झाले आहेत. या कंपनीने भारतात प्रवेश करताना उद्योग उभारणीसाठी आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूची निवड केली आहे. 

याआधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत टेस्लाला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी (aaditya thackeray) दिलं होतं. तसंच हे निमंत्रण केवळ गुंतवणूकीसाठी नाही तर भविष्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटीचा विचार करुन दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली होती.

हेही वाचा- टेस्लाची महाराष्ट्राऐवजी बंगळुरुला पसंती, आदित्य ठाकरेंवर मनसेची टीका

परंतु टेस्ला कंपनीने ‘टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने बंगळुरूत नोंदणी केल्याने राजकीय आरोपांना धार चढली. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली, बोलाची कढी बोलाचा भात, पेज-३ नेत्यांना झटका, असं ट्विट करत आदित्य यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्यानंतर आता आमदार रोहीत पवार यांनी ट्विट करत, टेस्ला ने R&D सेंटरसाठी कर्नाटकला पसंती दिली तरी ते त्यांचा नियोजित प्लांट महाराष्ट्रात उभारण्याबाबत सकारात्मक आहेत. आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आणि आदिती तटकरे असे महाराष्ट्रातील मंत्री टेस्लासह ई-वाहन कंपन्या आणण्यास प्रयत्नशील असून राज्य सरकारने (maharashtra government) नेमलेली एक समिती या कंपन्यांच्या संपर्कात आहे, अशी माहिती दिली.

दरम्यान टेस्ला कंपनी भारतात ‘मॉडेल ३ ’ या इलेक्ट्रिक कारपासून आपल्या उत्पादनाला सुरूवात करणार आहे. (ncp mla rohit pawar reacts on electric car manufacturing company tesla investment in maharashtra)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा