Advertisement

‘ती’ मलाही जाळ्यात अडकवत होती, भाजप नेत्याच्या एन्ट्रीने मुंडे प्रकरणाला वेगळं वळण

धनंजय मुंडे यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाकडून होत असतानाच ‘ती’ महिला मलाही जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होती, असा दावा चक्क भाजपच्याच एका नेत्याने केला आहे.

‘ती’ मलाही जाळ्यात अडकवत होती, भाजप नेत्याच्या एन्ट्रीने मुंडे प्रकरणाला वेगळं वळण
SHARES

बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाकडून होत असतानाच ‘ती’ महिला मलाही जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होती, असा दावा चक्क भाजपच्याच (bjp) एका नेत्याने केला आहे. यामुळे मुंडे प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.

भाजपा नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी आंबोली पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात तक्रार अर्ज दिला आहे. त्यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे की, रेणू शर्मा नावाची महिला २०१० सालापासून मला त्रास देत होती. ती वेगवेगळया फोन नंबरवरुन माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायची. परंतु मी तिला प्रत्येकवेळी टाळत होतो. रेणू शर्माला माझ्यासोबत संबंध प्रस्थापित करायते होते. ती मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होती, माझा पाठलाग करण्यापर्यंत तिची मजल गेली होती. तब्बल ५ वर्षे ती माझ्या मागावर होती. असा आरोप कृष्णा हेगडे यांनी केला आहे.

हेही वाचा- धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई निश्चित? शरद पवारांचं सूचक वक्तव्य

तिच्या म्युझिक व्हिडिओसाठी पैसे हवे असल्याने ती माझ्या मागे लागली होती. माझ्या काही परिचयाच्या माणसांकडून तिची माहिती काढल्यावर रेणू शर्मा हनी ट्रॅपमध्ये अडकवून फसवणूक करत असल्याचं मला समजलं. ६ जानेवारीला २०२१ ला तिचा अखेरचा मेसेज आला. ‘तुम्ही मला विसरलात का?’ असे तिने विचारलं होतं. त्यावर मी 'थम्ब' इमोजी वगळता तिच्या मेसेजला प्रतिसाद दिला नाही.

मात्र २ दिवसांपूर्वी धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्यावर तिनं केलेल्या आरोपांनंतर मला धक्काच बसला. आज तिने मुंडे यांना लक्ष्य केलं आहे. कदाचित दोन वर्षांपूर्वी हीच वेळ माझ्यावर आली असती. उद्या कदाचित दुसरा कोणी त्याजागी असेल, त्यामुळेच मी तिच्याविरुद्ध तक्रार करण्याचा निर्णय घेतला, असं कृष्णा हेगडे म्हणाले.

दरम्यान, रेणू शर्मा हिची बहिण करूणा शर्माचे आणि आपले परस्पर सहमतीने संबंध होते. त्यापासून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं असून दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलं आहे. परंतु केवळ ब्लॅकमेल करण्यासाठी रेणू शर्मा आपल्यावर बलात्काराचे खोटे आरोप करत असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला होता. 

तेव्हापासून भाजपकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. (bjp leader krishna hegde files complaint against renu sharma at amboli police station)

हेही वाचा- कौटुंबिक विषयांत राजकारण नको, मुंडे प्रकरणात संजय राऊत यांचं मत


संबंधित विषय
Advertisement