Advertisement

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 227 वॉर्ड कायम

प्रभाग रचनेची अधिसूचना जारी

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 227 वॉर्ड कायम
SHARES

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 227 वरून 236 केले जाणार यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र नगरविकास विभागाने आज प्रभागरचनेबाबत जारी केलेल्या आदेशानुसार मुंबई महापालिकेच्या निवडणुका 227 प्रभागांमध्येच घेतल्या जाणार आहेत.

मुंबईसोबतच ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरारसह सर्वच महापालिका, नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी प्रभाग रचनेचे आदेशही देण्यात आले आहेत.

प्रभागरचनेचे प्रारूप तयार करून निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याची जबाबदारी पालिका आयुक्तांची असेल. मान्यतेनंतर प्रभागरचना प्रसिद्ध करून हरकती आणि सूचना मागवून त्यावर सुनावणी घेतल्यानंतर अंतिम प्रभागरचनेचा प्रस्ताव आयुक्तांना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवावा लागेल. आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर त्याला प्रसिद्धी द्यावी लागेल.

सर्व महापालिकांतील प्रभागरचना तीनपेक्षा कमी आणि पाचपेक्षा जास्त सदस्यीय नसावी.

प्रभागरचनेची माहिती गुगल अर्थवर द्यावी. त्यात लोकसंख्या आणि अनुसूचित जाती-जमातींच्या वस्त्या अधोरेखीत केल्या जाव्यात.

मुदतीतच निवडणुका घेणे शक्य व्हावे म्हणून राज्य शासनाने मुंबई महानगरपालिकेची मुदत संपणार त्या कालावधीच्या सहा महिने अगोदरच्या कालावधीत महापालिकेच्या क्षेत्रात व हद्दीमध्ये बदल करू नयेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.



हेही वाचा

मुंबई, ठाण्यासह कोकणात गुरुवारपासून वादळी पाऊस!

कर्नाक ब्रिज 'या' तारखेला सुरू होण्याची शक्यता

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा