Advertisement

'मालमत्ता कर आकारणीसंदर्भात हवी मुदतवाढ'


'मालमत्ता कर आकारणीसंदर्भात हवी मुदतवाढ'
SHARES

मुंबई - मालमत्ता कर आकारणीसाठीचे भांडवली मूल्य मुंबई महानगर पालिकेकडून निश्चित करण्यात आले आहे. तर, याचा तपशील जनतेच्या माहितीसाठी प्रत्येक विभागाच्या सहाय्यक करनिर्धारक आणि संकलन यांच्या कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यानुसार 23 मार्च ते 13 एप्रिल 2017 दरम्यान जनतेला हा तपशील तपासत त्यावर हरकत घेत त्यासंबंधीचा अर्ज सादर करता येणार आहे. तपशील तपासण्यासाठी आणि हरकत अर्ज सादर करण्यासाठीचा वेळ खूपच कमी असल्याचे सांगत महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनने पालिका आयुक्त अजोय मेहता यांना एक पत्र पाठवत 30 एप्रिलपर्यंत यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.

हरकती अर्ज सादर करण्यास खूपच कमी वेळ आहे. त्यातही याबाबतची योग्य माहिती अनेकांना नसते. त्यामुळे हरकती सादर करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आम्ही आयुक्तांकडे केली आहे. 

- रमेश प्रभू, अध्यक्ष, महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर  असोसिएशन

बऱ्याचदा भांडवली मूल्य ठरवण्यात करनिर्धारक विभागाकडून चुका होतात. त्याचा फटका सोसायट्या वा घरमालकाला बसतो. प्रसंगी न्यायालयातही धाव घ्यावी लागते आणि त्यासाठी भरसमाठ खर्चही सोसावा लागतो. त्यामुळे, भांडवली मुल्याचा तपशील तपासून घेणे अत्यंत गरजेचे असते. दरम्यान, याबाबतची योग्य ती माहिती सोसायट्यांना, घरमालकांना नसल्याने महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअरने यासंबंधी मोफत मार्गदर्शन सुरू केले असून अंधेरीतील असोसिएशनच्या कार्यालयात जाऊन संबंधितांना याची अधिक माहिती घेता येणार आहे. अधिकाधिक सोसायट्या, सदस्य आणि घरमालकांनी या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा