
शिक्षक संघटनांच्या संयुक्त कृती समितीने या आंदोलनाची हाक दिली आहे. संघटनांचे म्हणणे आहे की, निवडणुकीशी संबंधित कामांमुळे शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण वाढत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर होत आहे.
2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET सक्तीमधून सूट द्यावी.
SIR अंतर्गत शिक्षकांवर सोपवण्यात आलेली BLO ड्युटी तात्काळ रद्द करावी.
सुरू असलेली पदोन्नती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करावी.
शिक्षकांची कमतरता वाढेल, असा दावा करत कर्मचारी मान्यता (स्टाफिंग) धोरण मागे घ्यावे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळा नियमित सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार कापण्यात येईल, असा इशाराही विभागाने दिला आहे.
मात्र, या इशाऱ्यानंतरही शिक्षक संघटनांनी आंदोलन नियोजनानुसारच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज राज्यातील अनेक भागांमध्ये शाळांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
