Advertisement

ठाण्यात शुक्रवारी दुधाचा तुटवडा जाणवू शकतो! 'हे' आहे कारण

ऐन दिवाळीच्या तोंडावर दूध विक्रेत्यांनी मोठी घोषणा केली आहे.

ठाण्यात शुक्रवारी दुधाचा तुटवडा जाणवू शकतो! 'हे' आहे कारण
SHARES

ठाण्यातील दूध विक्रेत्यांनी (Thane Milk News) एकदिवसीय लाक्षणिक बंदची घोषणा (Milk Vendor Strike) केली आहे. आज (गुरुवारी) रात्री 12 पासून शुक्रवार रात्री 12 वाजेपर्यंत दूध विक्री करणार नसल्याचं दूध विक्रेता संघानं जाहीर केलं आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर दूध विक्री बंद करण्याची घोषणा केली आहे. 2015 पासून आतापर्यंत एका लिटर मागे 20 रुपयांनी दूधाचे दर वाढले आहेत. पण दूध विक्रेत्यांना त्यांच्या कमिशनमध्ये 10 पैसे देखील वाढवून दिले गेले नाहीत. त्याचमुळे एक दिवस लाक्षणिक बंद ठेवण्यात येणार आहे.

या बंदामुळे तब्बल दहा लाख लिटर दूध विकले जाणार नाही. ठाण्यानंतर मुंबई आणि पनवेलमध्ये देखील संपाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

दूध विक्रेत्यांना फक्त दोन टक्के कमिशन मिळते. गेल्या पाच वर्षात विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये 10 पैसे देखील वाढ न झाल्याने विक्रेत्यांनी बंदाची घोषणा केली आहे.

दरम्यान, मुंबईत आता सुटे दूध सात रुपयांनी महागणार आहे. अलिकडेच अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर आता मुंबईत सूट्या दुधाचे दर वाढणार आहेत.

एक लिटर दुधासाठी ग्राहकांना आता 80 रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ 1 सप्टेंबर (गुरुवार) पासून लागू करण्यात येणार आहे. हे नवे 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असतील.

जनावराच्या चाऱ्याचा खर्च वाढला आहे. हरभरा सारख्या चाऱ्याचे दर वाढले आहेत. परिणामी याचा फटका दूध उत्पादकांना बसताना दिसत आहे. यामुळे दूध उत्पादकांनी सुट्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

अलिकडेच अमूल (Amul Milk) आणि मदर डेअरीने (Mother Dairy) दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) अमूलने दुधाच्या दरात चार टक्क्यांनी वाढ केली. यामुळे 17 ऑगस्टपासून अमूल दुधाच्या (Amul Milk) आणि मदर डेअरीच्या (Mother Dairy) दरात वाढ दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.



हेही वाचा

महागाईचा भडका! मुंबईत सुटे दूध 'इतक्या' रुपयांनी महागणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा