Advertisement

महागाईचा भडका! मुंबईत सुटे दूध 'इतक्या' रुपयांनी महागणार

ही दरवाढ 1 सप्टेंबर (गुरुवार) पासून लागू करण्यात येणार आहे.

महागाईचा भडका! मुंबईत सुटे दूध 'इतक्या' रुपयांनी महागणार
SHARES

मुंबईत आता सुटे दूध सात रुपयांनी महागणार आहे. अलिकडेच अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर आता मुंबईत सूट्या दुधाचे दर वाढणार आहेत.

एक लिटर दुधासाठी ग्राहकांना आता 80 रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ 1 सप्टेंबर (गुरुवार) पासून लागू करण्यात येणार आहे. हे नवे 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असतील.

जनावराच्या चाऱ्याचा खर्च वाढला आहे. हरभरा सारख्या चाऱ्याचे दर वाढले आहेत. परिणामी याचा फटका दूध उत्पादकांना बसताना दिसत आहे. यामुळे दूध उत्पादकांनी सुट्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

अलिकडेच अमूल (Amul Milk) आणि मदर डेअरीने (Mother Dairy) दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) अमूलने दुधाच्या दरात चार टक्क्यांनी वाढ केली. यामुळे 17 ऑगस्टपासून अमूल दुधाच्या (Amul Milk) आणि मदर डेअरीच्या (Mother Dairy) दरात वाढ दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, दिवाळीपर्यंत पोहे, चिवडा हा फराळही महागणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पोहे, भाजके पोहे, दगडी पोहे, पातळ पोहे, भडंग, मुरमुऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात गेल्या तीन महिन्यांत पोहे, भडंग, मुरमुऱ्याच्या दरात किलोमागे सरासरी पाच ते सहा रुपयांनी वाढ झाली आहे.

कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे ही दरवाढ झाली असून ही तेजी दिवाळीपर्यंत कायम राहील असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.



हेही वाचा

मुंबईकरांना दिलासा, मालमत्ता करातील दरवाढ 1 वर्ष पुढे ढकलली

गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद, आले मोठे कारण समोर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा