Advertisement

मुंबई बँकेवर शिवसेना-राष्ट्रवादीचं वर्चस्व, राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे अध्यक्ष

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मोठा धक्का बसलाय.

मुंबई बँकेवर शिवसेना-राष्ट्रवादीचं वर्चस्व, राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे अध्यक्ष
SHARES

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मोठा धक्का बसलाय. कारण मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावरुन प्रवीण दरेकरांना पायउतार व्हावं लागणार आहे. तर मुंबई बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे (Sidharth Kamble) यांनी विजय मिळवला आहे.

मुंबई बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आणि त्यांनी दरेकर यांना अध्यक्षपदावरुन बाजूला केलं आहे. त्यामुळे भाजप आणि दरेकरांसाठी हा मोठा धक्का समजला जातोय.

निवडणुकीपूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मुंबई बँकेतील प्रतिनिधींची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते.

दोन्ही पक्षातील नेत्यांनी मिळून मुंबई बँकेवरील भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत सत्ता परिवर्तन करण्याची रणनिती आखली. त्यानुसार अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांची उमेदवार जाहीर करण्यात आली. तसंच शिवसेना आमदार सुनिल राऊत आणि शिल्पा सरपोतदार यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याचंही समजतं.

मुंबई बँकेत शिवसेना राष्ट्रवादीचं गणित कसं जुळणार?

शिवसेना + राष्ट्रवादी काँग्रेस - ११ संचालक

भाजप - ९ संचालक



हेही वाचा

मराठीत पाट्या, 'श्रेय फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे...'; राज ठाकरेंचा इतर पक्षांना टोला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा