माहीमच्या मासळी बाजारात विक्रेत्यांची परवड

  • पूनम कुलकर्णी
  • सिविक
  मुंबई  -  

  माहीम - माहीमच्या मासळी बाजाराची ही आजची अवस्था. हे पाहून कुणालाही वाटेल की, कित्येक वर्षात याची डागडुजीच झालेली नाही.1993-94 मध्ये नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी हा मासळी बाजार त्यांच्या कार्यकाळात बांधून दिला होता. बाजाराच्या या दुरवस्थेमुळे मासेविक्रेत्यांचेही हाल होत आहेत. नगरसेवक या परिस्थितीकडे दुर्लक्ष करतायत, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. तर मासेविक्री करणाऱ्या कोळणींची संख्या वाढल्यानं फुटपाथवर छत घालून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिल्याचं नगरसेविका श्रद्धा पाटील सांगतात. माहीमच्या या मासळी बाजाराला आता महापालिकेची निवडणूक तरी पावते का, हा उत्सुकतेचा विषय ठरलाय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.