रेतीबंदर आणि मृदुंगआचार्य मैदानाला जोडलेल्या पुलाची दुरवस्था

 MAHIM
रेतीबंदर आणि मृदुंगआचार्य मैदानाला जोडलेल्या पुलाची दुरवस्था

माहीमच्या रेतीबंदर आणि मृदुंग आचार्य मैदानाला जोडणारा पालिकेने बांधलेला अनधिकृत पूल सध्या दुरवस्थेत असल्याचे चित्र आहे. दोन रस्ते ओलांडताना अपघात होऊ नये, यासाठी कॉजवे परिसरातील रहिवासी या पुलाचा वापर करतात. कॉजवे परिसरात 5-6 वर्षांपूर्वी मरोळपासून पाण्याचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला होता. या पाण्याच्या टनेलच्या प्रोजेक्टसाठी हा पूल बांधण्यात आला होता. या पुलाची मर्यादा काही कालावधीसाठीच होती. टनेलच्या कामानंतर हा पूल काढण्यात येईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र पुलाची मर्यादा संपलेली असताना अजूनही हा पूल काढण्यात आलेला नाही. या विभागातील रहिवासी या पुलाचा वापर करतात. या पुलाचे लोखंडी अँगल गंजले आहेत. पुलावरील छत आणि बाजूचे पत्रे तुटलेले आहेत. त्यामुळे हा पूल इथल्या रहिवाशांसाठी धोकादायक आहे. मधल्या काळात हा ब्रीज अधिकृत व्हावा यासाठी या विभागातील मनसे कार्यकर्त्यांनी प्रयत्न देखील केले होते.

तो पूल तात्पुरता होता, परंतु त्या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करून घेणार आहोत. तो पूल नागरिकांच्या वापरण्या लायक असेल तर आम्ही स्वतः तो पूल जी उत्तर विभागाच्या ताब्यात घेऊ. जर तो पूल सेवा देण्याच्या स्थितीत नसेल, तर तो ब्रीज आम्ही काढून टाकू.
रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त, जी उत्तर विभाग

Loading Comments