Advertisement

भिवंडीत कपड्यांच्या गोदामाला भीषण आग

भिवंडीच्या एमआयडीसी परिसरात कपड्यांच्या गोदामाला भीषण आगली. घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

भिवंडीत कपड्यांच्या गोदामाला भीषण आग
SHARES

भिवंडीच्या एमआयडीसी परिसरात कपड्यांच्या गोदामाला भीषण आगली. घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. या कंपनीत असलेले ३० ते ४० कामगार वेळेत बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. 

गुरूवारी पहाटेच्या दरम्यान भिवंडीतील सरवली एमआयडीसीमधील कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भीषण आग लागली. आगीत कोट्यवधी रुपयांच्या मशीन, कपडे जळून खाक झाले आहेत.कपिल रेयॉन इंडिया दोन मजली कंपनी आहे. 

गुरूवारी पहाटे आग लागल्यानंतर आगीचे लोळ सर्वत्र पसरले. यावेळी मोठा भडका उडाला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या असून कल्याण, ठाणे आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे आग विझवण्यात अडथळे येत आहेत. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.



हेही वाचा -

सामान्यांना पालिका मुख्यालयाची इमारत आतून पाहण्याची संधी

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिन्यांना 'या' भागात धोका


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा