Advertisement

ढिगाऱ्याखालून केला १०० नंबरला फोन अन् वाचला जीव


ढिगाऱ्याखालून केला १०० नंबरला फोन अन् वाचला जीव
SHARES

मै यहाँ हू... मुझे बचाओ... मै यहाँ हू... मुझे बचाओ... असं म्हणत ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी ज्यांनी १०० नंबर डायल केला ते सय्यद अहमद भेंडीबाजार येथील हुसैनीवाला इमारत दुर्घटनेतून सहिसलामत बाहेर अाले. त्यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झालं असून ते सध्या जे. जे. रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मूळचे बिहारमधील असलेले ५३ वर्षांचे सय्यद अहमद या इमारतीच्या बाजूलाच एका टेलरच्या दुकानात काम करतात. हुसैनीवाला इमारत जेव्हा कोसळली, तेव्हा सय्यद अहमद दुकानात काम करत होते. इमारत काेसळताना जोरदार आवाज झाल्यानं ते काय झालंय हे पाहण्यासाठी इमारतीच्या गेटजवळ पोहोचणार तेवढ्यात ५ मजल्यांची ही इमारत पत्त्यांसारखी कोसळली. या दुर्घटनेत सय्यदही ढिगाऱ्याखाली अडकले.



अशी झाली सुटका...

बकरी ईद असल्याने आम्हाला भरपूर ऑर्डर होती. म्हणून मी नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होतो. जोरदार आवाज झाल्यावर मी इमारतीच्या गेटजवळ आलो. तोपर्यंत अख्खी इमारत कोसळली. सिमेंट काँक्रिटचा ढिग माझ्या अंगावर पडू लागला. त्यात माझ्या पाठीला थोडा मार लागल्याने मी तेथेच पडलो. त्यानंतर मशीनमध्ये कटींग करायच्या कटरवर एक सळी पडली. त्यावर दुसऱ्या दुकानाचं शटर कोसळलं. या शटरखाली मी झोपलो. तेथून मी दोन-तीन जणांना फोन केला. १०० नंबरला कॉल करून मी पोलिसांना ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगितलं. पण, बचाव करणारे फक्त वरचाच ढिगारा उपसत होते. म्हणून मी पुन्हा फोन करुन त्यांना मी नेमका कुठे आहे ते सांगितलं, तेव्हा कुठे अडीच तासानंतर माझी त्या ढिगाऱ्याखालून सुटका झाली.

ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्यानंतर त्यांचा मोबाईल, पैसे, हातातील घड्याळ सर्व काही अॅम्ब्युलन्समधील कर्मचाऱ्यांनी काढून घेतल्या, या वस्तू अजूनही परत मिळाल्या नाहीत, असंही सय्यद अहमद यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.

सय्यद यांचा मालक काही कारणास्तव बिहारला गेल्याने त्यांचा १२ वर्षांचा मुलगा अहमद त्यांच्यासोबत काम होता. या इमारत दुर्घटनेत त्यांच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.


आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू

हुसैनीवाला इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १६ जण जखमी झाले आहेत. यापैकी काही जणांवर अजूनही जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



हे देखील वाचा -

एका मुंबईकराचं मुंबईकरांसाठी खुलं पत्र!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा