दीड तासांनंतर काढला गटारात अडकलेला पाय

 wadala
दीड तासांनंतर काढला गटारात अडकलेला पाय

वडाळा - वडाळा परिसरात एका इसमाचा गटारात पाय अडकल्याची घटना सोमवारी घडली. सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर इसमाचा पाय गटारातून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं. विशेष म्हणजे यामध्ये या इसमाच्या पायाला कोणतीही दुखापत झालेली नाही. सोमवारी रात्री वडाळा परिसरात एक इसम कामावरून घरी जाताना त्याचा पाय गटारात गेला. काही वेळ या इसमानं अडकलेला पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या प्रयत्नाला यश आलं नाही. अखेर अग्निशमन दलानं गैस कटरच्या मदतींन जाळी कापत इसमाचा पाय सुखरूप बाहेर काढला.

Loading Comments