संतप्त प्रवाशाने चालत्या ट्रेनमध्ये फेकली मिरचीपूड

Mumbai  -  

लोकल ट्रेनमध्ये बसण्याच्या जागेवरून अनेकदा वाद होत असल्याचे आपण सर्वांनी पाहिले आणि ऐकलीही असेल. अशीच एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

ट्रेनमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर फलाटवर उतरलेल्या एका प्रवाशाने रागाच्या भरात ट्रेनच्या खिडकीतून भांडण झालेल्या प्रवाशांवर चक्क मिरचीपूड फेकली आणि पळ काढला. शहाड रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला.

सध्या रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी एसी दुरुस्तीचे काम करतो. प्रवासादरम्यान झालेल्या भांडणामुळेच चालत्या ट्रेनमधील प्रवाशांवर मिरचीपूड फेकल्याची कबुली आरोपीने दिली आहे. स्टेशनच्या बाहेर बसणाऱ्या फेरीवाल्यांनी आरोपीला सीसीटीव्हीच्या दृश्यातून ओळखले. त्यामुळेच पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले.

हे देखील वाचा - ...आणि त्या प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचला!

Loading Comments