पालिकेची खड्ड्याला मलमपट्टी


  • पालिकेची खड्ड्याला मलमपट्टी
SHARE

टिळकनगर - चेंबूरच्या टिळकनगर परिसरात गेल्या 15 दिवसांपासून रस्त्याच्या मध्यभागी एका मॅनहोलचे झाकण तुटले होते. रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिकेकडून या मॅनहोलची दुरुस्ती करण्यात आली. मात्र कंत्राटदाराने केवळ नावापूर्तीच मलमपट्टी केल्याने सध्या येथील वाहतूक कोंडीत भर पडलीय. कंत्राटदाराने मॅनहोलच्या बाजूला मोठ्या प्रमाणत मातीचा ढिगारा ठेवल्याने टिळकनगर आणि लोखंडे मार्ग परिसरात जाण्यासाठी वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कंत्राटदारांच्या या ढिसाळ कामाबाबत पालिकेकडे लवकरच तक्रार दाखल करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ता नितीन नांदगावकर यांनी दिलीय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या