Advertisement

सचिन, आदित्यने केली बँडस्टँडची सफाई


सचिन, आदित्यने केली बँडस्टँडची सफाई
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवशी 17 सप्टेंबरला देशातील लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. याला प्रतिसाद देत क्रिकेटचा देव म्हणून प्रसिद्ध असलेला संचिन तेंडुलकर याने आपला मुलगा अर्जुनसह वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड परिसरात मंगळवारी सकाळी साफसफाई केली. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही सोबत होते.

मोदींनी देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही पत्र लिहून ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार सचिन तेंडुलकरने या अभियानात हजेरी लावली.

प्रत्येक नागरिकाने आपला देश हे आपलं घर समजून स्वच्छ करावं, असं आवाहन माजी क्रिकटेर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने केलं.


आदीत्य ठाकरे यांनी सफाई करतानाचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. तसेच सचिन तेंडुलकरचे आभारही मानले. 



मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे या दोघांसह सचिनचा मुलगा अर्जुन याने देखील अशा प्रकारे सफाई अभियान राबवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त करत त्यांचे भरभरून कौतुकही केले आहे.   






हेही वाचा - 

सचिन तेंडुलकर देवनार, शिवाजी नगरचा 'स्वच्छतादूत'



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा