Advertisement

सचिन तेंडुलकर देवनार, शिवाजी नगरचा 'स्वच्छतादूत'


सचिन तेंडुलकर देवनार, शिवाजी नगरचा 'स्वच्छतादूत'
SHARES

ऐन फाॅर्मात असताना दिग्गज गोलंदाजांचा 'सुपडा साफ' करणारा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर मुंबईतील गलिच्छ वस्त्यांसाठी 'स्वच्छता दूत' म्हणून पुढे आला आहे. नेहमीच कचरा आणि दुर्गंधीचा सामना करणाऱ्या देवनार, गोवंडीतील रहिवाशांना शौचालय, मल:निस्सारण व्यवस्थेसारख्या दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सचिनच्या पुढाकारानं 'मिशन २४' सुरू करण्यात आलं आहे.

मुंबई महापालिका आणि 'अपनालय' संस्थेतर्फे देवनार, शिवाजी नगर परिसरात या सुविधा रहिवाशांना उपलब्ध करून दिल्या जातील. मंगळवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन सचिननं ही माहिती दिली.


१० मजल्यांची कचऱ्याची इमारत

शिवाजी नगर झोपडपट्टी मुंबईतील दुसरी मोठी झोपडपट्टी आहे. मी स्वतः देवनारला जाऊन आलोय. १० मजल्यांची कचऱ्याची इमारत तुमच्याकडं 'आ' वासून पाहतेय की काय, असं या कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे बघून वाटतं. मीच का? कचऱ्यापासून मुक्ती हवी असेल, तर सगळ्यांनी आपापल्या परिसराचा अॅम्बेसेडर व्हावं, असं आवाहनही तेंडुलकरनं यावेळी केलं.


ही देखील एक मॅच

'स्वच्छता दूत' म्हणून मला जे काही करता येईल ते सर्व करायची माझी तयारी आहे. सद्यस्थितीतही बरेच रहिवासी घराच्या खिडक्यांमधून कचरा बाहेर टाकतात. ही गोष्ट मला खटकल्यावर मी त्यावर तोडगा काढण्यासाठी पुढं सरसावलो. एक गोष्ट लक्षात ठेवी की, बदल एका दिवसात होत नसतो, त्यासाठी प्रयत्नात सातत्य हवं. ही सुद्धा एक मॅच आहे. जी आपल्याला खेळायची आहे. सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास नक्कीच बदल दिसेल, असाही विश्वास सचिननं व्यक्त केला.

गेल्या ४४ वर्षांपासून सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या 'अपनालय' संस्थेचंही सचिननं कौतुक केलं.



हे देखील वाचा -

शहरातील कचरा विल्हेवाटीवर दिवसाला 2 लाखांचा खर्च

ग्रेट इस्टर्न लिंक्स सोसायटीची शून्य कचरा प्रकल्पाकडे वाटचाल


 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा