Advertisement

माथेरान ट्रॉय ट्रेनला सलून कोच जोडला जाणार

टॉय ट्रेनला जोडलेला एसी सलून कोच आठ आसनी कोच असेल.

माथेरान ट्रॉय ट्रेनला सलून कोच जोडला जाणार
SHARES

मध्य रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी माथेरान टॉय ट्रेनला विशेष वातानुकूलित सलून कोच जोडण्यात आला आहे. टॉय ट्रेनला जोडलेला वातानुकूलित सलून कोच हा आठ आसनी कोच असेल. नेरळ ते माथेरान आणि परतीच्या प्रवासासाठी त्याच दिवशी तसेच रात्रीच्या मुक्कामासाठी बुकिंगसाठी उपलब्ध असेल.

टॉय ट्रेनच्या वातानुकूलित सलूनमध्ये प्रवास करणे हा केवळ एक प्रकारचा अनुभवच नाही तर निसर्ग जवळून पाहण्याचा आणि माथेरानच्या नैसर्गिक वातावरणाच्या शांततेत मग्न होण्याचा थराराची भर पडेल. 

ट्रेनच्या वेळा आणि वातानुकूलित सलून कोचचे शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

वेळा कशा :

नेरळ ते माथेरान
ट्रिप-ए नेरळ प्रस्थान सकाळी 08.50 माथेरान आगमन सकाळी 11.30 वाजता.

ट्रिप-बी नेरळ प्रस्थान सकाळी 10.25 माथेरान आगमन दुपारी 01.05 वाजता.

माथेरान ते नेरळ
ट्रिप-सी माथेरान प्रस्थान दुपारी 02.45 नेरळ आगमन दुपारी 04.30 वाजता.

ट्रिप- डी माथेरान प्रस्थान दुपारी 04.00 नेरळ आगमन संध्याकाळी 06.40 वाजता.

भाडे किती असेल ?
राऊंड ट्रिप त्याच दिवशी पूर्ण होईल:
आठवड्यातील दिवस रु. 32,088 /- करासह
आठवड्या अखेरीस रु. 44,608 /- करासह.
त्याच दिवसाच्या राऊंड ट्रिपच्या प्रवासासाठी, ए+सी किंवा बी+डी यापैकी एकाचा पर्याय निवडता येतो.

रात्रीच्या मुक्कामासह राउंड ट्रिप:

आठवड्यातील दिवशी रु. 32,088/- कर + रु. 1,500/- प्रति तास डिटेंशन शुल्कासह.
आठवड्याअखेरीस रु. 44,608/- कर + रु. 1,800/- प्रति तास डिटेंशन शुल्कासह
रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप प्रवासासाठी, कोणताही एक ए किंवा बी आणि परतीचा पर्याय सी किंवा डी निवडू शकतो.



हेही वाचा

एसी डबलडेकरनंतर मुंबईकरांसाठी बेस्ट सुरू करणार वॉटर टॅक्सी सेवा

मढ ते वर्सोवा प्रवास होणार अवघ्या 10 मिनिटांत, जाणून घ्या कसा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा