'महापौरांचा लाल दिवा कायम'

 Pali Hill
'महापौरांचा लाल दिवा कायम'

मुंबई - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सरकारी वाहनांवरच्या लाल दिव्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयामुळं मुंबईच्या महापौरांच्या अधिकृत वाहनाला आता कायमचा लाल दिवा मिळणार आहे. तसंच काही नवीन पदांसाठीही लाल दिवा मिळण्याची शक्यता आहे. बुधवारी झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं केंद्रात आणि राज्यात संवैधानिक पदावर असणारी व्यक्तीच लाल दिवा वापरू शकते, असा निकाल दिला होता. या निकालानंतरही मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर लाल दिव्याच्या गाडीचा वापर करत होत्या. त्यामुळं त्यांच्यावर टीका झाली होती. मात्र स्नेहल आंबेकर यांनी लाल दिव्याची गाडी वापरणं बंद केलं नव्हतं. आता परिवहन विभागानं याबाबत निर्णय घेतल्यामुळं महापौरांना लाल दिवा कायमचा मिळणार आहे.

Loading Comments