Advertisement

मुंबईत फिरणं होणार सोपं


मुंबईत फिरणं होणार सोपं
SHARES

मुंबई - पर्यटकांना तसंच मुंबईकरांना मुंबईतील एखाद्या ठिकाणी जाणं, एखादे ठिकाण शोधणं सोपं व्हावं यासाठी मुंबई महानगरपालिका पुढे सरसावली आहे. त्यानुसार पालिकेनं महत्त्वाच्या अशा 190 ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन महिन्यांत हे फलक लावण्यात येणार असल्याची माहिती प्रमुख अभियंता (रस्ते आणि वाहतूक) संजय दराडे यांनी दिली आहे.

असे असतील फलक
-इंडियन रोड काँग्रेसच्या मानकांनुसार फलकाची रचना असणार
- 100 फलक 4.5 मीटर रुंदीचे आणि 1.8 मीटर लांबीचे असतील, तर ज्यावर हे फलक लावले जातील त्या खांबांची उंची 7.8 मीटर असेल
-90 छोटे फलक 1.2 रुंदीचे आणि 1.8 मीटर लांबीचे असतील, तर खांबांची उंची 3.9 मीटर असेल
-फलकावरील मजकूर, नावे लांबूनही वाचता येतील, अशा प्रकारे फलकांची रंगसंगती असेल
फलक लावण्यात येणारी काही ठिकाणं
दादाभाई नौरोजी मार्ग
खान अब्दुल गफ्फार खान मार्ग (वरळी सी-फेस रोड)
सेनापती बापट मार्ग
स्वामी विवेकानंद मार्ग
वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो सिनेमा)
हाजीअली जंक्शन
महाराणा प्रताप जंक्शन
कामगार रुग्णालय जंक्शन
ना.सी फडके मार्ग
लाल बहादूर शास्त्री मार्ग

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा