Advertisement

#MeToo चा गैरवापर नको, मुंबई उच्च न्यायालयाने खडसावलं

दिग्दर्शक विकास बहल याने अनुराग कश्यप आणि अन्य काही जणांविरोधात १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. या दाव्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे मत नोंदवलं आहे.

#MeToo चा गैरवापर नको, मुंबई उच्च न्यायालयाने खडसावलं
SHARES

'#MeToo' हा विषय संवेदनशील असून या मोहिमेचा गैरवापर करू नका, असं स्पष्ट मत शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. त्याचवेळी ही मोहीम केवळ पीडित महिलांसाठी आहे. तेव्हा या पीडित महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीही आरोपबाजी करू नये, असंही न्यायालयानं खडसावलं आहे.


कुणाची याचिका?

दिग्दर्शक विकास बहल याने अनुराग कश्यप आणि अन्य काही जणांविरोधात १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. या दाव्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे मत नोंदवलं आहे.


महिलेचं समर्थन

बहलविरोधात एका महिलेनं लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. हा आरोप करणारी महिला फँटम फिल्म्समधील माजी कर्मचारी आहे. बहल याच्यावरील या आरोपानंतर बहलचे पार्टनर दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी पीडित महिलेच्या समर्थानार्थ विधानं केली होती.


१० कोटींचा दावा

त्यानंतर बहल यांनी या दोघांसह अन्य काही जणांविरोधात १० कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकला आहे. या दाव्यासंदर्भातील सुनावणीदरम्यान न्यायालयानं '#MeToo'च्या निमित्ताने समोर आलेल्या प्रकरणांसाठी पुरूष आणि महिलांची समिती स्थापन करायला हवी, असं मत नोंदवतानाच '#MeToo'च्या गैरवापरावर नाराजीही व्यक्त केली.हेही वाचा-

#MeToo: बदनामी सहन न झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न

#MeToo: माझ्यावर कारवाई करू नका, आलोकनाथ यांचं 'सिन्टा'ला साकडं

#MeToo: माझ्यावरील अारोप खोटे, नाना पाटेकरांचं सिन्टाला उत्तरRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा