Advertisement

पावसानं दिली मुंबईकरांना हूल!


पावसानं दिली मुंबईकरांना हूल!
SHARES

गेले दोन दिवस मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र शनिवारी आणि रविवारी या दोन्ही दिवशी मुंबईतल्या काही भागातच पाऊस पडला. रविवारी सकाळी दादर, माटुंगा या परिसरात पाऊस झाला, तर रात्री खार, सांताक्रूझ या परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. पण, त्यातही आनंदाची बाब म्हणजे मोसमी वारे आणखी पुढे सरकले आहेत.

रायगडधील श्रीवर्धनसह मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर तसेच आणखी काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार साधारण येत्या 10 जूनपर्यंत विदर्भ वगळता इतर भागांत मोसमी वारे पोहोचतात. पण, आता हवामान अनुकूल असून दोन दिवसांमध्ये हे वारे उत्तरेकडे म्हणजेच मुंबईच्या दिशेने येतील, असा अंदाज आहे.

मुंबई, ठाण्यात दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला होता. पण, रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सांताक्रूझ येथे फक्त 1 मिमी तर कुलाबा येथे 2 मिमी पावसाची नोंद झाली. आकाशात ढगांनी काळोख केल्याने फक्त कमाल तापमान कमी झाल्याचे कळते. त्यामुळे रविवारी सांताक्रूझ आणि कुलाबा इथले कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसने कमी होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा