Advertisement

हवामानाचा अचूक अंदाज मिळणार, मुंबईत येणार नवं डाॅपलर रडार!

मुंबई महापालिकेने डाॅपलर रडार बसवण्यासाठी जोगेश्वरीत ४ वर्षांपूर्वीच एक जागा निश्चित केली होती. या जागेवर हे नवीन डाॅपलर रडार बसवण्यात येणार आहे. डाॅपलर रडार बसवण्यासाठी १८ महिन्यांचा वेळ लागणार आहे. त्यानंतर तो कार्यान्वीत करण्यात येईल.

हवामानाचा अचूक अंदाज मिळणार, मुंबईत येणार नवं डाॅपलर रडार!
SHARES

राज्यातील हवामानाचा अंदाज अचूक मिळावा म्हणून राज्य सरकारने हवामान विभागाला नवीन डाॅपलर रडार देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार हवामान विभागाला लवकरच नवीन डाॅपलर रडार मिळणार आहे. हे रडार जोगेश्वरीत बसवण्यात येणार आहे.

कुठे बसवणार रडार?

मुंबई महापालिकेने डाॅपलर रडार बसवण्यासाठी जोगेश्वरीत ४ वर्षांपूर्वीच एक जागा निश्चित केली होती. या जागेवर हे नवीन डाॅपलर रडार बसवण्यात येणार आहे. डाॅपलर रडार बसवण्यासाठी १८ महिन्यांचा वेळ लागणार आहे. त्यानंतर तो कार्यान्वीत करण्यात येईल.

न्यायालयात याचिका

मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने डाॅपलर रडार बसवण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. २०१५ मध्ये वकील अटलबिहारी दुबे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी हवामान विभागाला हवामानाची अचूक माहिती देता यावी म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची मागणी केली होती.

रेल्वे, महापालिकेला झापलं

सोबतच मुंबईत तुंबणाऱ्या पाण्याची समस्या उपस्थित करत महापालिकेने पाण्याचा उपसा करण्यासाठी जागोजागी बसवलेले पंप कामच करत नसल्याची तक्रारही केली.

या याचिकेवर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारचं म्हणणं ऐकून घेत महापालिका आणि रेल्वे प्रशासनाला चांगलच झापलं. पश्चिम आणि मध्य रेल्वेने पाणी तुंबू नये म्हणून मागील ४ वर्षांत काय उपाययाेजना केल्या याचा अहवाल देण्याचेही निर्देश दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी १ आॅगस्टला होणार आहे.

हेही वाचा-

नालासोपारा स्टेशनवर दोन्ही बाजूनं बांधणार भिंत

पर्यटकांनो, संध्याकाळी पाचनंतर भुशी डॅम बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा