Advertisement

विलगीकरणासाठी म्हाडा, एसआरएकडून २,६२५ घरं

मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक जणांचं विलगीकरण करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर विलगीकरणासाठी जागेची अडचण येऊ नये म्हणून मुंबई पालिकेने त्यासाठी तयारी सुरू केली आहे.

विलगीकरणासाठी म्हाडा, एसआरएकडून २,६२५ घरं
SHARES

मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक जणांचं विलगीकरण करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर विलगीकरणासाठी जागेची अडचण येऊ नये म्हणून मुंबई पालिकेने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यात आता म्हाडा, एसआरएनेही पुढाकार घेतला आहे. एसआरएने विलगीकरणासाठी 2 हजार तर म्हाडा प्राधिकरणाने ६२५ घरं उपलब्ध केली आहेत. ही सर्व घर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाणार आहे.

 कोरोनाची व्याप्ती वाढून ऐनवेळी विलगीकरणासाठी जागांची कमतरता पडू नये म्हणून राज्य सरकार आणि पालिका जास्तीत जास्त  घरें उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईत आपल्या हाती असलेल्या घरांचा आढावा त्यांनी घेतला आहे. त्यातून एसआरएने २ हजार, तर म्हाडाने ६२५ घरे पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

या सर्व २,६२५ घरांत पाणी, वीजपुरवठा सुरळीत राहील, हे पाहिले गेले. त्यापैकी बहुतांश घरांची संपूर्ण स्वच्छता झाली असून लवकरच ती जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येतील. ही घरे मुंबईतील विविध भागात आहेत. त्या-त्या इमारतीत उपलब्ध असलेल्या घरांनुसार त्याचे वाटप होईल. त्यात म्हाडाकडून मानखुर्दमध्ये २६५, चारकोपमध्ये १७०, महावीरनगरमध्ये १९० घरे आहेत. ही घरे ताब्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याची जबाबदारी घेतली जाईल. ही घरे सद्यस्थिती निवळेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताब्यात राहतील. त्यानंतर ती पुन्हा म्हाडा, एसआरए यंत्रणांना सुपूर्द केली जातील.



हेही वाचा -

मुंबईतील पंचांच्या आर्थिक मदतीसाठी माजी पंचांचा मदतीचा हात

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन पेट परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा