मुंबई (mumbai) बाहेर गाई-म्हशींचे (buffalow) शेड (cowshed) स्थलांतरित करण्यास दूध उत्पादक संघाने विरोध केला आहे.
पालघरमधील दापचरी येथे शेड हलविल्यास दररोज ताजे दूध मुंबईत पोहोचवणे शक्य होणार नाही. त्यामुळे शेडसाठी आरे (aarey) कॉलनीतच जागा द्यावी, तसेच उपनगरातील शेडमधील सुमारे दहा हजार जनावरं आरे डेअरी कॉलनीतच राहावी, अशी मागणी दूध उत्पादक संघाने केली आहे. या प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc) प्रशासनाने आता राज्य सरकारच्या दुग्ध व्यवसाय विकास विभागाला पत्र पाठवले आहे.
मुंबई उपनगरात ठिकठिकाणी गाई-म्हशींचे शेड आहेत. 2005 मध्ये, राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने या गोठ्यांचे मुंबईबाहेर पालघर (palghar) जिल्ह्यातील दापचरी (dapchari) येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र या निर्णयाला मुंबई दूध उत्पादक संघाने उच्च न्यायालयात आव्हान केले. उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
पण तिथेही निकाल संघटनेच्या विरोधातच होता. त्यामुळे शहरातील शेड हलविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. मात्र या निकालाला तीन ते चार वर्षे उलटूनही मुंबईत शेड सुरूच आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने महापालिकेकडे मदत मागितली होती.
राज्य शासनाच्या संबंधित विभागाकडे गोशाळा हटविण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने या गोशाळा हटविण्याची मागणी नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती.
त्यानुसार, महापालिकेने मुंबईतील गायी-म्हशींच्या शेडचे सर्वेक्षण केले आणि त्यांना नोटिसा पाठवल्या. पूर्व आणि पश्चिम उपनगरात 264 गोशाळे असून त्यामध्ये सुमारे दहा हजार जनावरे आहेत.
पालिकेने (brihanmumai municiple corporation)नोटीस पाठवल्यानंतर दूध उत्पादक संघाचे म्हणणे ऐकण्यासाठी पालिकेने गेल्या महिन्यात बैठक बोलावली होती. या बैठकीत दूध उत्पादक संघाच्या प्रतिनिधींनी आपली बाजू मांडली.
दापचरी येथील जागा दूध व्यवसायासाठी योग्य नाही, दररोज मुंबईत दूध आणणे व विक्री करणे परवडणारे नाही.
त्यामुळे या गोशाळांना आरे कॉलनीतच जागा द्यावी, अशी मागणी संघटनेने केली. त्यामुळे आरे डेअरी वसाहतीतील शेडचे पुनर्वसन करण्याच्या अर्जावर विचार करण्यासाठी पालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या दुग्धविकास विभागाला नुकतेच पत्र पाठवले आहे.
सर्वाधिक शेड गोरेगावात आहेत
मुंबईत एकूण 23 शेड असून सर्वाधिक शेड गोरेगाव (goregaon) परिसरात आहेत. गोरेगावपाठोपाठ जोगेश्वरी, कांदिवली, दहिसर, कुर्ला, विद्याविहार परिसरात देखील आहेत.
हेही वाचा