Advertisement

मिरा-भाईंदरमध्ये १० पर्यंत दुकानं खुली ठेवण्याची मागणी


मिरा-भाईंदरमध्ये १० पर्यंत दुकानं खुली ठेवण्याची मागणी
SHARES

मीरा भाईंदरमध्ये दररोज कोरोनाव्हायरसचे रुग्ण समोर येत आहेत. कोरोनामुळे मृतांचा आकडा देखील वाढत आहे. असं असूनही, अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याच्या उद्देशानं रात्री दहा वाजेपर्यंत दुकानं सुरू करण्याची मागणी मीरा-भाईंदरामध्ये जोर धरत आहे.

मीरा-भाईंदर इथं सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत दुकानं सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, सध्या मीरा-भाईंदरमध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत ते उघडण्यास परवानगी आहे. या संदर्भात भाजप नगरसेवक रवी व्यास यांनी सोमवारी महापौर ज्योत्स्ना हसनळे यांना पत्र पाठवलं.

त्याचबरोबर मनसेनं मीरा-भाईंदर विधानसभेचे आयुक्त संदीप राणे यांना आयुक्तांना दहा दिवसांच्या आत रात्री ११ वाजेपर्यंत दुकानं उघडण्यास परवानगी देण्यास सांगितलं आहे. राणे म्हणाले की, एमबीएमसीनं परवानगी न दिल्यास ते आत्महत्या करतील.

सोमवारी मीरा-भाईंदरमध्ये २२० नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तसंच, २४ तासाच्या आत ७ लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. निश्चितच ही एमबीएमसीसाठी चिंताजनक आहे आणि हा आकडा कसा तरी खाली आला पाहिजे. यावर, सरकारव्यतिरिक्त, सामान्य लोकांचीही जबाबदारी आहे की त्यांनी सामाजिक अंतर पाळले पाहिजे. तसंच सक्तीनं मास्क परिधान केलं पाहिजे.



हेही वाचा

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेत ८ कोटी लोकांचे सर्वेक्षण

मुंबईतील 'इतक्या' इमारती टाळेबंदीतून मुक्त

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा