Advertisement

मीरा भाईंदरमध्ये पाणीकपात! 'असा' होणार पाणीपुरवठा

बदलापूरमधील बारवी धरणाची पातळी सध्या 27 टक्क्यांच्या वर आहे.

मीरा भाईंदरमध्ये पाणीकपात! 'असा' होणार पाणीपुरवठा
SHARES

बिपरजॉय या चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन होण्यास उशीर झाल्याने, मीरा भाईंदरमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे मिरा-भाईदरमध्ये पाणी कपात लागू करण्यात आली आहे. बदलापूरमधील बारवी धरणाची पातळी सध्या 27 टक्क्यांच्या वर आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या (MBMC) पाणीपुरवठा विभागाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दर पंधरा दिवसांनी एक २४ तास पाणीपुरवठा बंद असणार आहे. १५ जुलैपर्यंत ही पाणीकपात लागू केली आहे. 

दरम्यान, पाणीकपातीच्या संकटावर मात करण्यासाठी धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे हे तपासण्यांसाठी पाटबंधारे विभागाने सर्व धरणांच्या पातळीचा आढावा घेतला आहे.

MIDC बारवी धरणातून पाणी घेते आणि ते MBMC आणि ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि इतर औद्योगिक पट्ट्यांसह त्याच्या भागांना पुरवते. 

2009 पासून सर्व बांधकामांसाठी रेन-वॉटर हार्वेस्टिंग (RWH) यंत्रणा बसवणे बंधनकारक आहे. तथापि, भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.  

मीरा-भाईंदर पाण्यासाठी पूर्णपणे MIDC आणि STEM वर अवलंबून आहे, शिवाय, मीरा भाईंदरमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. बऱ्याच ठिकाणी पाईप्स फुटले आहेत. त्यामुळे वारंवार होणाऱ्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतरही कमी दाबामुळे पुढील दोन दिवस सेवा प्रभावित राहतील.



हेही वाचा

बायोगॅस प्लांट उभारण्यासाठी महानगर गॅस लिमिटेडसोबत पालिकेचा सामंजस्य करार

ठाणे : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर कोलशेत खाडी उद्यान सर्वांसाठी खुले

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा