Advertisement

मागाठाणे मेट्रो स्टेशन धोक्यात, बिल्डरसोबत पालिका-MMRDAवर कारवाईची प्रकाश सुर्वेंची मागणी

बोरिवलीतील मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळ भूस्खलन झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

मागाठाणे मेट्रो स्टेशन धोक्यात, बिल्डरसोबत पालिका-MMRDAवर कारवाईची प्रकाश सुर्वेंची मागणी
SHARES

बोरिवलीतील मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळ भूस्खलन झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर प्रशासनासोबतच नागरिकांमध्येही भितेचे वातावरण पसरले आहे. यामुळे मागाठाणे मेट्रो स्थानकाला धोका पोहोचणार की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे.    

बुधवारी मेट्रो स्टेशनजवळ खोदलेल्या खड्ड्यात मेट्रो स्टेशनच्या पायऱ्यांजवळचा काही भाग खचला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. पण थेट मेट्रो स्टेशन लगतची जागा खचल्याने या घटनेवर चिंता व्यक्त केली जात आहे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मेट्रो स्टेशनलगतच्या जमिनीला कोटिंग न केल्यामुळे आणि काही इतर कारणास्तव जमीन खचली, त्यामुळे मेट्रो स्टेशनच्या पायात याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी एमएमआरडीए, महापालिका, मेट्रो आणि बिल्डर या चौघांचीही चुकी आहे, त्यामुळे संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी मेट्रो परिरसरात पाहणी करताना केली.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी एमएमआरडीएचे, महापालिकेचे अधिकारी यांच्या सोबत भूस्खलन झालेल्या ठिकाणाची पाहणी केली.

पश्चिम द्रुतगती मार्गावर बोरिवलीतील मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळील C. C. I प्रकल्पाचे विकासकाने बांधकामासाठी उत्खनन केले. भूस्खलन रोखण्यासाठी संरक्षण भिंत बांधणे अपेक्षित असतानाही, विकासकाने या प्रकल्पात मजबूत, संपूर्ण संरक्षण भिंत बांधली नाही. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून बांधलेला रस्ता खचला असा आरोप होत आहे.

या प्रकल्पाला लागूनच राज्य सरकारच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे मागाठाणे स्थानक आहे. भूस्खलन होत राहिल्यास मागाठाणे स्थानक मेट्रो कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तथापि, सदर विकासकाने मेट्रो प्राधिकरणाकडून नो-डिस्टर्बन्स सर्टिफिकेट घेतले आहे की नाही? त्याचप्रमाणे विकासकाला नो-डिस्टर्बन्स सर्टिफिकेट देताना बांधकाम अटींचे पालन केले आहे का? याची माहिती द्यावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली आहे. तसेच या प्रकणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळ दरड कोसळल्याने वेस्टन एक्सप्रेस हायवेचा सर्व्हिस रोड आता बंद करण्यात आला आहे. भूस्खलनानंतर आमदार प्रकाश सुर्वे एमएमआरडीए आणि मेट्रोचे अधिकारी आज पाहणीसाठी आले. तर दुसरीकडे कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल करून अभियंता आणि कंत्राटदाराला अटक केली आहे.



हेही वाचा

मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळील रस्ता खचल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

मागाठाणे मेट्रोच्या प्रवाशांनो 'हे' बदल जाणून घ्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा