Advertisement

मुंबई: MMRDA अखेर BKC तील वाहतूक समस्या सोडवणार

BKC तील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी MMRDA वेगवेगळे उपाय करत आहे.

मुंबई: MMRDA अखेर BKC तील वाहतूक समस्या सोडवणार
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) एका एजन्सीला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. इथे वाहतूक कोंडी अधिक होते. कारण कॉर्पोरेट्स, पंचतारांकित हॉटेल्स, रुग्णालये आणि डायमंड बाजार इथे आहेत.

शनिवार आणि रविवारच्या वाहतूक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बीकेसी येथे भेट दिल्यानंतर, एमएमआरडीए आयुक्त डॉ संजय मुखर्जी यांनी अखेर परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांनी BKC मधील सात ट्रॅफिक जंक्शन्स आणि स्थानांची पाहणी केली जी मेट्रो रेल्वे आणि हाय-स्पीड रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या कामांमुळे सतत ट्रॅफिक जामने त्रस्त असतात. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मार्ग शोधण्यासाठी वाहतूक सल्लागाराची नियुक्ती करून तपासणी केली जाईल.

वाहतुक कोंडीवर अभ्यास करण्यासाठी आणि उपाय सुचवण्यासाठी संस्थेने तज्ञ वाहतूक सल्लागाराची नियुक्ती केली आहे. मुखर्जी यांनी बीकेसीमधील अनेक ट्रॅफिक जंक्शन्सना भेटी दिल्या.

MMRDA अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, वाहतूक कोंडी BKC कनेक्टर लँडिंग, भारत डायमंड बोर्स, मुंबई क्रिकेट असोसिएशन, कन्व्हेन्शन सेंटर, MTNL, इंडियन ऑइल पेट्रोल पंप आणि गोदरेज BKC टॉवर या ठिकाणी अधिक होते. 



हेही वाचा

शिवाजी पार्क मोकळा श्वास घेणार?

मुंबईतील आगीच्या घटनांमध्ये यंदा ७ टक्क्यांनी वाढ

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा