Advertisement

शिवाजी पार्क मोकळा श्वास घेणार?

महापालिका आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय...

शिवाजी पार्क मोकळा श्वास घेणार?
SHARES

दादर शिवाजी पार्क मैदानावरील माती उडत असल्याने धूळ प्रदूषणाचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे. ही धूळ नियंत्रित करण्यासाठी महापालिकेने स्मॉग टॉवर बसवण्यासह मैदानातील माती काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे. या प्रस्तावावर सल्लागाराच्या अहवालानंतरच हे उपाय अमलात आणले जाणार आहेत.

शिवाजी पार्क मैदानात अनेक क्लब आणि खेळपट्ट्या असून क्रिकेटचे सराव आणि सामने होतात. तसेच सकाळी-सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी अनेक जण पार्कात येतात. मैदानातील माती उडून ती धूळ आसपासच्या इमारतींमध्ये जाते आणि रहिवाशांना त्याचा मोठा त्रास होतो.

शिवाजी पार्कातील उडणाऱ्या धुळीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. ऑक्टोबर अखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत पालिका अधिकारी, खासदार राहुल शेवाळे आणि मनसे नेत्यांची बैठक पार पडली होती. त्यांनी स्मॉग टॉवरबरोबरच शिवाजी पार्कातील काही भागात गवत लावणे आदी पर्याय सूचविले होते.

तर रहिवाशांकडून मैदानातील लाल माती कमी करण्याच्या मागणीलाही जोर धरू लागली आहे. मात्र ही माती कमी केल्यास मैदानात खड्डे होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रस्तावातील उपाययोजना

  • आठ ठिकाणी स्मॉग टॉवर बसवण्यात येणार आहेत.
  • मैदानातील दोन इंचापर्यंतची लाल माती काढावी.
  • गरज असेल त्या पट्ट्यात गवत लावणे.
  • पंधरा दिवसांत सल्लागार नियुक्ती

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी संबंधित प्रस्तावास मंजुरी दिल्याचे महापालिका उपायुक्त (परिमंडळ २)रमाकांत बिरादार यांनी सांगितले. ही कामे आयआयटी सल्लागारांच्या सूचनांनंतरच होणार आहेत. हेही वाचा

नायरमधे 10 मजली कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार

दादरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे 35 टक्के काम पूर्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा