Advertisement

खो-खो, कबड्डी स्पर्धांची कॉमेंट्री मराठीतून करा, मनसेचे SONY स्पोर्टसला निवेदन

खो-खो आणि कबड्डी स्पर्धांची कॉमेंट्री मराठीतून करा अशी मागणी मनसेने केली आहे.

खो-खो, कबड्डी स्पर्धांची कॉमेंट्री मराठीतून करा, मनसेचे SONY स्पोर्टसला निवेदन
SHARES

खो-खो आणि कबड्डी स्पर्धांची कॉमेंट्री मराठीतून करा अशी मागणी मनसेने केली आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी SONY स्पोर्टस वाहिनीला निवेदन देखील दिले आहे.

यापूर्वी आयपीएलचे (IPL Commentary) समालोचन मराठीत व्हावे, यासाठी मनसेने SONY स्पोर्टसला चांलगीच तंबी दिली होती. आता महाराष्ट्रात होणाऱ्या खोखो-कबड्डी स्पर्धांचेही (KhoKho- Kabaddi Tournament) समालोचन मराठीतून करावे अशी मागणी मनसेचे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी केली आहे.

महाराष्ट्रात स्पर्धा आणि तरीही मराठीतून समालोचन नाही! आयपीएल सामन्यांच्या वेळी मनसे पद्धतीने पाठपुरावा केला तेव्हा त्यांना झुकावं लागलं आणि मराठीतून समालोचन ऐकायला मिळालं. खो-खो आणि कबड्डी हे तर मराठी मातीतले खेळ (Marathi Soil Games) आहेत मग तिथे मराठीतून समालोचन करायचं नाही अशी हिंमतच कशी होते? असा सवाल खोपकर यांनी उपस्थित केला.

सोनी स्पोर्टसला त्यांनी स्वतः जाऊन निवेदन दिले आहे. त्यानंतरही निर्णय बदलला नाही तर मग काय करणार, ते काय सांगायला हवं?, असा इशारा खोपकर यांनी दिला आहे. मराठीचा अपमान सहन करणार नाही मनसेची भूमिका असल्याचेही ते म्हणाले.

“आयपीएल संपेपर्यंत मराठीत समालोचनाचा पर्याय द्या, नाहीतर खळ्ळखट्याक पद्धतीने आंदोलन करु. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी तुमची असेल”, असा इशारा मनेसेने डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्राद्वारे दिला होता. यानंतर सामने पाहणाऱ्या IPL पाहणाऱ्या प्रेक्षकांना खेळाचे समालोचन त्यांच्या पसंतीच्या भाषेत ऐकण्यासाठी मराठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला. यामध्ये हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू, कनडा आणि बंगाली या भाषांसह मराठीचा पर्याय देखील देण्यात आला.

मनसेकडून याआधी ऑनलाईन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅमेझॉन कंपनीला पत्र पाठवण्यात आलं होतं. अ‍ॅमेझॉनमध्ये मराठी भाषेचा समावेश असावा, अशी मागणी मनसेने पत्राद्वारे केली होती. ही मागणी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी मान्य केली आहे.

डिजिटल सेवेत मराठीच्या समावेशासाठी अ‍ॅमेझॉनचे शिष्टमंडळ मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. अ‍ॅमेझॉननंतर मनसेने डिस्ने हॉटस्टारकडे मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी पत्र पाठवलं आहे.



हेही वाचा

मुंबईत मंकीपॉक्स अलर्ट, कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सज्ज

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा