Advertisement

मुंबईत मंकीपॉक्स अलर्ट, कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सज्ज

मंकीपॉक्सचे रुग्ण सध्या मुंबईत आढळले नसले तरी पालिका अलर्ट मोडवर आहे.

मुंबईत मंकीपॉक्स अलर्ट, कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सज्ज
SHARES

मंकीपॉक्सचे (Monkeypox) रुग्ण सध्या मुंबईत (Mumbai) आढळले नसले तरी पालिका अलर्ट मोडवर आहे. यासाठी पालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) आयसोलेशन बेड तैनात ठेवण्यात आले आहेत.

संशयित रुग्ण आढळल्यास “नॅशनल व्हायरोलॉजी ऑफ पुणे’कडे नमुने पाठवण्यात येणार आहेत. मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देश आणि जग नुकताच कोरोनाच्या संकटातून बाहेर येत असताना भारतासह 80 देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत आहेत.

पालिकेचे विशेष रुग्णालय असलेल्या ‘कस्तुरबा’ रुग्णालयात सध्या सुमारे 800 बेड तैनात आहेत. मात्र सद्यस्थितीत रुग्ण किंवा लक्षणे असलेले संशयित आढळले नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर रुग्णालयासह 16 उपनगरीय रुग्णालये व सर्व दवाखान्यांना त्यांच्याकडे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांमध्ये लक्षणे आढळल्यास तातडीने कळवण्याचे निर्देश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.

कीपॉक्स आजारात शरीरावर कांजण्यांप्रमाणे फोड, चेहरा, हात, पाठ, पोटावर लाट चट्टे, थंडी, ताप, थकवा, डोकेदुखी, हाडांमध्ये वेदना, ग्रंथींमध्ये सूज अशी लक्षणे आढळून येतात. अशी लक्षणे आढळल्यास पालिकेकडे संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.



हेही वाचा

चिंता वाढली, मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित

मुंबईत डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या संख्येत वाढ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा