दादरचा कबुतरखाना बंद करा - मनसे

Dadar
दादरचा कबुतरखाना बंद करा - मनसे
दादरचा कबुतरखाना बंद करा - मनसे
See all
मुंबई  -  

दादरमधील कबुतरखाना, हे आपण सर्वांनाच माहीत असलेले ठिकाण. पण आता हाच कबुतरखाना बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेता आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी पालिकेकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात पालिकेला पत्रही पाठवले आहे. या कबुतरखान्यामुळे आरोग्याच्या समस्या आणि लहान मुलांना श्वसनाचे विकार जडत असल्याची तक्रार तिथल्या स्थानिक नागरिकांनी अनेकदा आपल्याकडे केली असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

हा कबुतरखाना 1933 मध्ये पाण्याच्या कारंज्याच्या स्वरुपात बांधण्यात आला होता. त्यानंतर अनेकांनी धार्मिक भावना जपत या कबुतरांना खाण्यासाठी दाणे घालण्यास सुरुवात केली. पण कालांतराने ते नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत गेल्याने हा कबुतरखाना लवकरात लवकर बंद करावा अशी मागणी मनसेने केली आहे.

अशा प्रकारे अनेक भागात असलेल्या कबुतरखान्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर कसे घातक परिणाम होऊ शकतात याबद्दल मुंबई लाइव्हने आपल्या दर्शकांना यापूर्वी बातमी दाखवली होती. यासंदर्भात आता राजकीय पक्षांनी देखील कारवाई सुरू केली आहे.

हे देखील वाचा - 

ही पहा मुंबईची ओळख...

हे देखील वाचा - 

पाटण मंडल एएलएमची पार्किंगच्या विळख्यातून सुटका कधी?

कबुतरखाना ही दादरची ओळख आहे. पक्षी घाण करतात म्हणून कबुतर खाना बंद करणे हा यावरील पर्याय नाही. तो कबुतरखाना वारंवार साफ केला जातो. परंतु तरीही तो साफ करण्याची गरज असेल तर मी स्वतः जी उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांशी या संदर्भात चर्चा करेन.

विशाखा राऊत, शिवसेना नगरसेविका

कबुतरखाना हे काही आजकाल तयार केलेले नाही ती जागा कबुतर खाण्यासाठी अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे तो कबुतर खाना जतन करण्यात यावा. कबुतर खाण्याची वेळेत साफ सफाई व्हावी. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे या संदर्भात मी स्वतः जी उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना कबुतरखाना साफ करण्यासंदर्भात लवकरात लवकर पत्र लिहिणार आणि भेटणार देखील आहे. कबुतर खाना जतन केला जावा याकरता भाजपाकडून मी स्वतः पूर्ण प्रयत्न करेन.

वसंतराव जाधव, भाजपा मुंबई उपाध्यक्ष


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.