Advertisement

मुलुंडमध्ये मनसेचे भीक मांगो आंदोलन


मुलुंडमध्ये मनसेचे भीक मांगो आंदोलन
SHARES

मुलुंड - पालिकेने वीज बिल न भरल्याने मुलुंड पूर्वेकडील राजे संभाजी मैदान गेले महिनाभर अंधारात आहे. पालिकेने जवळ जवळ 70 हजारांचे वीज बिल थकवल्याने महावितरणाने राजे संभाजी मैदानाची वीज खंडित करत कारवाईचे पाऊल उचलले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे सोमवारी संध्याकाळी भीक मांगो आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष सागर देवरे आणि मनसे विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मैदानात आलेल्या खेळाडूंकडे तसेच नागरिकांकडे भीक मागण्यात आली. हे मिळालेले पैसे डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून पालिकेच्या टी विभागाला देण्यात येणार आहे आणि यानंतरही दुर्लक्ष केल्यास टी विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे मनसेच्या सागर देवरे यांनी सांगितले. तर, या संदर्भात त्वरित पावले उचलावीत असं टी वॉर्ड कार्यालयाला कळवले असल्याची माहिती भाजपा नगरसेविका रजनी केणी यांनी दिली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा