Advertisement

'सवयी बदला मुंबई बदलेल' दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी


'सवयी बदला मुंबई बदलेल' दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी
SHARES

'फडणवीस बोलतात फेरीवाल्यांचा प्रश्न आम्ही सोडवला...उद्धवजी बोलतात फेरीवाल्यांचा प्रश्न आम्ही सोडवला...आणि फेरीवाला विरोधी आंदोलनाच्या हजारच्यावर केसेस मात्र मनसैनिकांवर पडल्या... ये-जो पब्लिक है वो सब जानती है' हे सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, आता मनसेने दादरमध्ये प्रत्यक्षात बॅनरबाजी केली आहे.

हे बॅनर दादरच्या केशवसुत पुलावर दिनांक 4 नोव्हेंबरला मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत. मनसेचे हे बॅनर आणि त्यावरचा मजकूर हा प्रवासी आणि दादारकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.


IMG_20171105_154011.jpg


'सवयी बदला मुंबई बदलेल'

याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यावर कुठेही मनसेने फेरीवाला मुक्त मुंबई केली असा उल्लेख न करता 'सवयी बदला मुंबई बदलेल' असे लिहण्यात आले आहे. त्याच बरोबर सोशल मीडियावर विशेष व्हायरल झालेली मनसेची फेरीवाले मुक्त मुंबईसाठी घेतलेली शपथ प्रिंट करण्यात आली आहे.

मनसे आंदोलनांमुळे मुंबईमधील अनेक रेल्वे स्थानके फेरीवाला मुक्त झाल्याचे चित्र आहे. परंतु, नक्की हा बदल कुणामुळे घडला, हे निश्चित कळणे कठीण आहे. कारण श्रेय लाटण्याचा प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न केला जात आहे.


हेही वाचा -

फेरीवालामुक्त मुंबईसाठी 'मनसे शपथ'


संबंधित विषय
Advertisement