Advertisement

मराठी गाणे न वाजवल्याबद्दल मनसे कार्यकर्त्याची हॉटेल मॅनेजरला मारहाण

याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

मराठी गाणे न वाजवल्याबद्दल मनसे कार्यकर्त्याची हॉटेल मॅनेजरला मारहाण
SHARES

मराठी गाणी न वाजवल्याबद्दल हॉटेल व्यवस्थापकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होतोय. याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. बुधवारी रात्री नवी मुंबईतील वाशी परिसरात ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठी गाणी वाजवत नसल्याच्या आरोपावरून मनसे कार्यकर्ते आणि हॉटेल व्यवस्थापन यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापपर्यंत पोलिसांनी आरोपींवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

व्हिडिओमध्ये पार्टी बुकिंग दाखवण्यासाठी एक महिला मॅनेजरशी मराठी गाण्यांवर बोलत असल्याचे दिसून येते. हॉटेल मॅनेजर नकार देताना ऐकू येतो, "कृपया मॅडम, ज्याने आमच्यासोबत पार्टी बुक केली आहे त्यालाच मी बुकिंग दाखवतो."

अचानक मनसेच्या एका कार्यकर्त्याने मध्यस्थी करत ‘आम्ही महाराष्ट्रात असून फक्त मराठी गाणी वाजवली जातील’, असे सांगितले. हॉटेल मॅनेजरने 'नाही' असे उत्तर देताच त्या व्यक्तीने त्याच्या तोंडावर चापट मारली आणि नंतर इतर कार्यकर्त्यांनी त्यात सामील होऊन मॅनेजरला बेदम मारहाण केली.

भाजपचे आमदार राम कदम यांनी एका टिव्ही चॅनलला माहिती दिली की, "आम्ही कोणाचीही गुंडगिरी खपवून घेणार नाही, मग तो पक्षाचा कार्यकर्ता असो वा नेता. आम्ही कायदा हातात घेऊ. हे उद्धव ठाकरेंचे सरकार नाही, राज्य एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस चालवत आहेत, आम्ही त्यावर कडक कारवाई करू.”

नुकताच ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी 'हर हर महादेव' या मराठी चित्रपटाचा शो जबरदस्तीने बंद पाडला. शिवाय, या गुंडगिरीचा निषेध केल्याबद्दल काही चित्रपट पाहणाऱ्यांना निर्दयीपणे मारहाण करण्यात आली.

काही दिवसांनंतर, जितेंद्र आव्हाड यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये ते मुंब्रा परिसरातील एका नवीन पुलाच्या उद्घाटन समारंभात एका महिलेला धक्काबुक्की करताना दिसत आहेत.



हेही वाचा

स्वच्छता गृहातील कमोड स्वच्छ राखण्यासाठी मध्य रेल्वेची अनोखी आयडिया

मुंबईकरांसाठी आता ऑनलाईन पार्किंग बुकिंग सेवा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा