Advertisement

कर भरण्यासाठी ठाण्यात ‘मोबाइल व्हॅन’, पालिकेचा अभिनव उपक्रम

ठाणेकरांना कराचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या संकल्पनेतून मोबाइल व्हॅनची निर्मिती करण्यात आली आहे.

कर भरण्यासाठी ठाण्यात ‘मोबाइल व्हॅन’, पालिकेचा अभिनव उपक्रम
SHARES

लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर आता ठाणे महापालिकेने मालमत्ता करवसुलीवर भर दिला आहे. यासाठी पालिकेने अभिनव उपक्रम राबवला आहे. महापालिका प्रशासनाने कराचा भरणा करण्यासाठी ‘मोबाइल व्हॅन’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मागील आठ दिवसांपासून या व्हॅनद्वारे ठाणे शहरात करवसुली सुरू आहे. यामुळे ठाणेकरांना घराजवळच कराचा भरणा करणं शक्य झालं आहे. 


ठाणेकरांना कराचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या संकल्पनेतून मोबाइल व्हॅनची निर्मिती करण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये मालमत्ता कर रोखीने, धनादेश, धनाकर्ष अथवा डेबिट कार्ड, एटीएम कार्डने भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कर भरल्याची पावतीही लगेच नागरिकांना मिळणार आहे. 


ही मोबाइल व्हॅन पूर्णपणे रिझव्‍‌र्ह बँकेच्या प्रमाणकानुसार आहे. यामध्ये संगणक, प्रिंटर आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा, ऑपरेटर, चालक आणि सुरक्षारक्षकही देण्यात आला आहे. याचा सर्व खर्च बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेने दिली.


मालमत्ता कर संकलन करण्यासाठी सार्वजनिक सुटींच्या दिवशी किंवा इतर दिवशी गृहसंकुलांमध्ये शिबिरे राबविण्यात येणार असून तिथे करवसुलीसाठी मोबाइल व्हॅनचा उपयोग केला जाणार आहे. एखाद्या गृहनिर्माण संस्थेने मालमत्ता कर भरण्यासाठी व्हॅनची मागणी केली तर हे व्हॅन संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या संकुलात पाठविण्यात येत आहे.


हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत घट

नवी मुंबईत महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी १८६ दिवसांवर


 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा