मोनोरेल सेवेत 10 स्वदेशी बनावटीचे नवीन डबे समाविष्ट करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
सध्या मोनोरेल दर 15 ते 30 मिनिटांच्या अंतराने धावत असताना, नव्या डब्यांच्या समावेशामुळे ही गाडी दर 6 मिनिटांनी धावू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. यामुळे प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या 10 पैकी 7 गाड्या आधीच मुंबईत दाखल झाल्या आहेत. बाकीच्या 3 गाड्याही लवकरच दाखल होतील. हा संपूर्ण ताफा डिसेंबर 2025 पर्यंत सेवेत दाखल होईल.
चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनोरेल मार्गावर प्रवासीसंख्या वाढवून तो आर्थिक तोट्यातून सावरण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) विविध उपाययोजना राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर मोनोरेल सेवेत 10 स्वदेशी बनावटीचे नवीन डबे समाविष्ट करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
मोठ्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न अत्यल्प असल्याने एमएमआरडीएने या प्रकल्पाला चालना देण्यासाठी नवे पावले उचलली आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून, मोनोरेल मार्गिकेला मेट्रो मार्गांशी जोडण्याची योजना आखण्यात आली आहे. यामध्ये मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे) आणि मेट्रो 2ब (अंधेरी पश्चिम ते मंडाले) या मार्गांसोबत समन्वय साधला जाईल. या योजनेमुळे मोनोरेलचा उपयोग अधिक प्रवाशांना करता येईल आणि प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.
हेही वाचा