Advertisement

मुंबईकरांनो, 23 आणि 24 जूनला मुसळधार पावसाची शक्यता!


मुंबईकरांनो, 23 आणि 24 जूनला मुसळधार पावसाची शक्यता!
SHARES

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मुंबईकरांना प्रचंड उकाडा, कधी कडक ऊन तर, कधी ढगाळ वातावरण अशा विचित्र वातावरणाचा सामना करावा लागत आहे. पण, आता येत्या 23 आणि 24 जूनला मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बुधवारी माटुंगा, दादर, माहीम, गोरेगाव या परिसरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.


पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून, समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेगही वाढत आहे. त्यामुळे मुंबईत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. मुंबईत बुधवारी दुपारी काही भागांत अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे वातावरणात काही वेळ गारवा निर्माण झाला होता. मात्र, काही क्षणांतच पुन्हा उन्हाच्या झळांनी तापमानात वाढ झाली. मुंबई आणि परिसरात दिवसभर सरासरी 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.


पुढील 24 तासांत आकाश ढगाळलेले राहील आणि काही भागांत तुरळक सरींची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईत पावसाच्या एक-दोन सरींनी हजेरी लावली असली तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा तलावाच्या क्षेत्रात 2 सेमी पावसाची नोंद झाली आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा


(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement