Advertisement

मुंबईसह 'या' जिल्ह्यांत पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता


मुंबईसह 'या' जिल्ह्यांत पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता
SHARES

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसानं पुनरागमन केलं आहे. मुंबई, कोकणासह मराठवाड्यात बुधवारी मुसळधारांचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पालघर, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांच्या काही भागांवर तीव्र ढग जमा झाल्यानं मुंबईसह उपनगरे, अलिबाग, ठाणे, माथेरान, कल्याण इथं मुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच बुधवारी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील काही तासांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासोबत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट देखील होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मंगळवारी सांताक्रूझ इथं सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत ७८.४ तर कुलाबा इथं ३२.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत सांताक्रूझ इथं ४९ तर कुलाबा इथं २९.८ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. सोमवारी मध्यम स्वरुपाच्या पावसानंतर रात्री पावसाचा जोर वाढला होता.

कर्नाटकच्या वर असलेले पूर्व-पश्चिम वाऱ्याचे क्षेत्र मंगळवारी चक्रीय वात स्थितीत परावर्तित झाले. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील पावसाचा जोर वाढल्याचे समजतं

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा