Advertisement

यंदा पावसाळ्यात मुंबईत २९१ ठिकाणी पाणी तुंबणार?

महापालिकेनं त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे.

यंदा पावसाळ्यात मुंबईत २९१ ठिकाणी पाणी तुंबणार?
SHARES

यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हवामान खात्यानं पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार महापालिकेनं पावसाळापूर्व कामाची आखणी केली आहे. परंतु महत्वाचं म्हणजे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत तब्बल २९१ ठिकाणी पाणी तुंबू शक्यता असल्याचा अंदाज महापालिकेनं व्यक्त केला आहे. तसंच, महापालिकेनं त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली आहे. 

पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या या ठिकाणांसह अन्य जागी पाणी उपसा करणारे सुमारे ३५० हून अधिक पंप सज्ज ठेवण्यात येणार आहेत. मुंबईत पाणी तुंबू नये यासाठी नालेसफाई, मॅनहोल, पर्जन्य जलवाहिन्यांची साफसफाई, पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांवरील अतिक्रमणं हटवण्याची कारवाई तसंच, पंपिंग स्टेशनचा आढावा घेऊन दरवर्षी मे महिन्यात तयारी पूर्ण केली जाते. 

पावसाळ्यात मुंबई आणि उपनगरांतील विविध भागांत पाणी तुंबतं. परिणामी महापालिकेवर टीका केली जाते. त्यामुळं यंदा पालिकेची सर्व यंत्रणा झाडून कामाला लागते. साथीमुळं कर्मचाऱ्यांची उपस्थिती घटल्यानं यंदाच्या पावसाळ्यात प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. मुंबईत मागील वर्षी २२५ पाणी तुंबण्याची ठिकाणं होती, तर २९८ पंप बसवले होते. पंपांसाठी ५५ कोटी रुपये खर्च झाले होते. यंदा २९१ ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता असून तुंबलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी ३०० हून अधिक पंप सज्ज ठेवले जाणार असून, या पंपांकरीता महापालिका ७० कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

पाणी तुंबण्याची ठिकाणं

  • कुलाबा : गणेशमूर्तीनगर, गीतानगर, आंबेडकरनगर
  • वरळी : वरळी कोळीवाडा, प्रभादेवी आदर्शनगर, गोमातानगर, पांडुरंग बुधकर मार्ग लोअर परळ, दीपक सिनेमागृह परिसर
  • माटुंगा : खोदादाद सर्कल दादर टीटी, कोरबा मिठागर, भीमवाडी वडाळा, रेनॉल्ड्स कॉलनी, शिवशक्तीनगर, वच्छराजनगर, मुख्याध्यापक भवन सायन, चुनाभट्टी बस डेपो, प्रतीक्षा नगर समाज मंदिर हॉल, हेमंत मांजरेकर मार्ग, गांधी मार्केट किंग्ज सर्कल
  • मालाड : मार्वे क्वीन परिसर, गंगाबावडी नंबर १, लोटस इमारत, मालाड सब-वे, पाटकरवाडी, मंचुभाई रोड, पुष्पा पार्क, नडियादवाला चाळ, पारस अपार्टमेंट, लगून रोड
  • कांदिवली : दामुनगर, आकुर्ली रोड, समता नगर कांदिवली पूर्व, चारकोप मार्केट, भाबरेकरनगर, एकतानगर, गणेशनगर कांदिवली पश्चिम
  • घाटकोपर : १५१ न्यू पंतनगर, पोलिस वसाहत, नारायणनगर, देवकाबाई चाळ, गौरीशंकरवाडी, हरीपाडा कादरी चाळ, विद्याविहार स्टेशन, घाटकोपर स्टेशन, लक्ष्मीनगर म्हाडा कॉलनी
  • भांडुप : मोरारजीनगर, पाइपलाइन सब-वे, चंदन रुग्णालय, टँक रोड, हरिश्चंद्र खोपकर मार्ग, पाटीलवाडी, भांडुप स्टेशन, उषानगर पोलिस चौकी, गांधीनगर, विक्रोळी रेल्वे स्टेशन परिसर, श्रीरामपाडा, उदयश्री सोयायटी
  • मुलुंड : एस. एल. रोड.-जव्हेर रोड जंक्शन, रणजित सोसायटी, शांती कॅम्पस, हिरानगर, भगवती सोसायटी, जमुना सोसायटी, केळकर कॉलेज, एलआयसी कॉलनी, शीतल दर्शन, साहनी कॉलनी नवघर रोड
  • वांद्रे पश्चिम : एस. व्ही. रोड रेल्वे कॉलनी, जयभारत सोसायटी, नॅशनल कॉलेज, अल्मेडा पार्क ६ वा आणि १० वा रोड, रेक्लेमेशन, खार सब-वे
  • चेंबुर : सोमैया नाला, सुभाष नगर, शिवाजी नगर, देवनार नाला, मानखुर्द पीएमजी नाला, महाराष्ट्र नगर, बुद्ध नगर, रिफायनरी दक्षिण, विजयनगर, नवजीवन सोसायटी, इंदिरा नगर वाशीनाका, स्वस्तिक चेंबर, सुमननगर, पोस्टल कॉलनी रोड १५



हेही वाचा -

यंदा पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी

'तारक मेहता का उल्टा चष्मा' पाहूून खुष झाला आयसीयूतला पेशंट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा