Advertisement

आनंदवार्ता! यंदा १ जूनला मान्सून केरळात दाखल होणार

यंदा मान्सून केरळमध्ये वेळेत दाखल होणार आहे. १ जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

आनंदवार्ता! यंदा १ जूनला मान्सून केरळात दाखल होणार
SHARES

देशातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून केरळमध्ये वेळेत दाखल होणार आहे. १ जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल तर १५ ते २० जून या कालावधीदरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज आहे, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा मान्सून १ जून रोजी दाखल होईल. हा प्रारंभिक अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग १५ मे आणि ३१ मे रोजी पावसाचा अधिकृत अंदाज वर्तवेल. मागील २ वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळं महाराष्ट्रात मान्सून लांबला होता. मात्र, सध्या अशी कोणतीही चिन्ह दिसत नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळं केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा