Advertisement

कोरोना रूग्णाच्या अंत्यसंस्काराला फक्त ५ लोकांना परवानगी

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ५ पेक्षा जास्त लोकांना आता जाता येणार नाही. तसे आदेशच आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत.

कोरोना रूग्णाच्या अंत्यसंस्काराला फक्त ५ लोकांना परवानगी
SHARES

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ५ पेक्षा जास्त लोकांना आता जाता येणार नाही. तसे आदेशच आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत. यासंबंधीचं एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. पत्रकात करोनाची बाधा होऊन एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार करण्यासाठी ५ पेक्षा जास्त लोक नकोत असे आदेश दिले आहेत. 


पत्रकात सांगण्यात आलं आहे की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह काही विशिष्ट प्रक्रिया करुन प्लास्टिक बॅगमध्ये बंद केला जाईल. त्यानंतरच तो अंत्यसंस्कारासाठी दिला जाईल. अंत्यसंस्कारासाठी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी हजर असता कामा नये. मृत रुग्णांपासून कुणालाही करोनाचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे

आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या सहीने हे पत्रक काढण्यात आलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही २१० च्या वर गेली आहे. तर भारतात ही संख्या १ हजारच्या वर गेली आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण हा चिंतेचा विषय झाला आहे. संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू आणि सेवा सोडल्या तर कोणतीही दुकानं सुरु नाहीत. महाराष्ट्र आणि पंजाब ही या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.


हेही वाचा -

लष्कर दाखल झाल्याची अफवा पसरवणाऱ्या तरुणाला अटक

कोरोना बराही होईल, पण ‘या’ महाभयंकर आजाराचं काय?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा