लष्कर दाखल झाल्याची अफवा पसरवणाऱ्या तरुणाला अटक

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. डॉक्टर्स आणि पोलीस यंत्रणा जीव धोक्यात घालून आपलं कर्तृत्व पार पाडत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही काही माथेफिरू अफवा पसरवण्याचं काम करत आहे.

लष्कर दाखल झाल्याची अफवा पसरवणाऱ्या तरुणाला अटक
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. डॉक्टर्स आणि पोलीस यंत्रणा जीव धोक्यात घालून आपलं कर्तृत्व पार पाडत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही काही माथेफिरू अफवा पसरवण्याचं काम करत आहे. लष्कर दाखल झालंय, अशी सोशल मिडीयावर अफवा पसरवणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सोहील सलीम पंजाबी असं या आरोपीचं नाव आहे. सोहील मुंबईतील पठाणवाडीमध्ये राहतो.

सोशल मिडीयावर सध्या कोरोनासंबंधीत मेसेजचं प्रमाण वाढलं आहे. मात्र, काही जण अपुऱ्या माहितीच्या आधारे सोशल मिडीयावरून अफवा पसरवत आहेत. कोणतीही खातरजमा न करता हे माथेफिरू मेसेज व्हायरल करत आहेत.  सोहील सलीम पंजाबीने लष्कर मुंबईत दाखल झाल्याची अफवा पसरवली. 

त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये पोलिसांची जागा आता लष्कराने घेतली आहे.  नळ बाजार,भिंडी बाजार, डोंगरी, मदनपुरा, काला पानी आणि सात रास्ता परिसरात परिस्थितीत हाताबाहेर गेली आहे.  त्यामुळे येथे लष्कराला पाचारण करण्यात आलं असं त्याने व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. परंतु, अशी कोणतीही परिस्थिती या परिसरात निर्माण झाली नव्हती.  या व्हिडिओच्या आधारे  अफवा पसरवल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी  सोहील सलीम पंजाबी याला अटक केली आहे.


हेही वाचा -

भीतीनं सिलिंडर बुक करण्याची गरज नाही- इंडियन ऑईल

Bombay IITकडून अॅपची निर्मिती, 'क्वॉरन्टाईन' व्यक्तींवर ठेवणार लक्ष




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा