Advertisement

प्रसंगावधान दाखवत ट्रेन थांबवणाऱ्या मोटरमनचा सत्कार


प्रसंगावधान दाखवत ट्रेन थांबवणाऱ्या मोटरमनचा सत्कार
SHARES

सोमवारी सकाळच्यादरम्यान पनवेलहून सीएसटीएमच्या दिशेने लोकल सेवा तासाभरापर्यंत ठप्प झाली होती. कारण होते पनवेलच्या ट्रॅकवर रुळाला गेलेला तडा... पण, जर हा तडा त्या मोटरमनने वेळीच पाहिला नसता तर खूप मोठी दूर्घटना घडू शकली असती.

मोटरमन महेंद्र विश्वनाथ जठार हे सोमवारी ड्युटीवर असताना लोकलला रुळावर हादरे बसल्याने त्यांनी वेळीच लोकल थांबवून लोको इन्स्पेक्टर राजू यांच्यासोबत घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा रुळाला तडे गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर ही सर्व माहिती त्यांनी कंट्रोल रुमला दिली. त्यामुळे मागून येणाऱ्या लोकलही थांबवण्यात आल्या. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे जरी वाहतूक एक तास उशिराने सुरू झाली असली तरी मोठा अपघात होता होता राहिला असे म्हटलं तरी वावगे ठरणार नाही.

पनवेल हेडक्वार्टरचे मोटरमन महेंद्र विश्वनाथ जठार आणि लोको इन्स्पेक्टर राजू यांच्या प्रसंगावधानाबद्दल विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना हजार रुपये बक्षीस आणि प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.


हेही  वाचा - 

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळपासूनच प्रवाशांना मनस्ताप


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा