Advertisement

मुंबईची जीवन वाहिनी ठरते अपघात वाहिनी


मुंबईची जीवन वाहिनी ठरते अपघात वाहिनी
SHARES

मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या लोकलने प्रवास करणे आता जीवघेणे ठरत आहे. दिवसेंदिवस रेल्वे अपघातात मृतांची संख्या वाढत असतानाच जनजागृती केल्यानंतरही अपघातांच्या संख्येला आळा घालण्यात रेल्वे प्रशासनाला अपयश आले आहे. गरुवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर झालेल्या रेल्वे अपघातांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले. मुख्य म्हणजे मृतांची ओळख अजूनही पटली नसल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


अपघात रेल्वे प्रशासनासाठी डोकेदुखी

उपनगरीय रेल्वे मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढत आहेत. तर रेल्वेरुळ न ओलांडण्याचे आवाहन रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून वारंवार करण्यात येते. मात्र, प्रवाशांचे याकडे दुर्लक्ष होत असले तरी दिवसेंदिवस वेगवेगळ्या उपाययोजना करून देखील अपघात संख्या वाढत चालली असून यावर आळा घालण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत असल्याचे समोर आले आहे.


गुरुवारच्या अपघाताची आकडेवारी

स्थानकमृतांची संख्याजखमींची संख्या
सीएसटीएम
12
दादर
10
कुर्ला
20
ठाणे
20
डोंबिवली
01
कल्याण
22
कर्जत
00
वडाळा रोड 
00
वाशी
12
पनवेल
01
चर्चगेट
01
मुंबई सेंट्रल
00
वांद्रे
00
अंधेरी
02
बोरीवली
01
वसई रोड
21
पालघर
10
एकूण1213



हेही वाचा - 

आठवड्याभरात रेल्वे अपघातात ५६ मृत्यू, ७६ जखमी






Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा